
क्रिकेटरच्या आकृती अग्रवाल सोबतच्या अफेअरची चर्चा आहे. आकृती अग्रवाल सोशल मीडियावरील फेमस स्टार आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 3.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. सोबतच यूट्यूब वर 88 हजार सब्सक्राइबर्स आहेत. आकृतीचा जन्म लखनऊमध्ये झालाय. त्यानंतर ती मुंबईत शिफ्ट झाली. मुंबईत दोघे एका रेस्टॉरंट बाहेर दिसले. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चेने जोर पकडला.

मुंबईच्या एका रेस्टॉरंटमधून ब्लॅक आऊटफिटमधील आकृतीचा पृथ्वी शॉ सोबतचा निघतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला. त्यानंतर दोघांच्या रिलेशनशिप स्टेट्सची चर्चा सुरु झाली. आता या कपलच नाव ट्रेंड होतय.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या अफेअरची चर्चा वाढली. अलीकडे 2025 गणेश चतुर्थीचा सण पृथ्वी आणि आकृतीने एकत्र साजरा केला. आकृतीने दोघांचा फोटो इन्स्टाग्रामर शेअर केला. या फोटोनंतर डेटिंगच्या अफवेने वेग पकडला.

आकृती अग्रवाल फक्त एक इन्फ्लुएंसर नाही, तर चित्रपटात सुद्धा पाऊल ठेवतेय. बॉलिवूड फिल्म 'त्रिमुखा' मधून ती डेब्यु करत असल्याची माहिती आहे. इथून तिच्या करिअरला एक वेगळं वळण मिळू शकतं.

क्रिकेटर पृथ्वी शॉ चं आधी निधी तापडियासोबत नाव जोडलं गेलेलं. पण त्यांचं ब्रेकअप झाल्याच समोर आलं. या चर्चांवर अजून दोघांनी मौन सोडलेलं नाही.