हात-पाय आकडलेले, सर्व शरीर निळं पडलेलं, 30 वर्षीय अभिनेत्रीचा अचानक मृत्यू, तीन तासात काय घडलं?

दिव्यांकाने एका इंटरव्यूमध्ये सांगितलं होतं की, तिला अभिनय आणि डान्सची लहानपणापासून आवड होती.सुनंदा शर्मा यांच्या गाण्यावर तिचा टिकटॉक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओला 20 मिलियन पेक्षा जास्त व्यूज मिळाले होते. इन्स्टाग्रामवर तिचे 13 लाख फॉलोवर्स आहेत.

| Updated on: Apr 23, 2026 | 11:06 AM
1 / 5
उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही आता या जगात नाही. तिने अवघ्या वयाच्या 30 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी रात्री दिव्यांकाची तब्येत बिघडली. चक्कर येऊन ती खाली कोसळली. त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर मार लागला. लगेच तिला रुग्णालयात नेण्यात आलं. Divyanka Sirohi Instagram

2 / 5
 पण तिचे प्राण वाचवता आले नाहीत. दिव्यांकाच्या निधनाने  हरियाणावी इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. हरियाणाची फिल्म इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. या इंडस्ट्रीतील अनेकांना दिव्यांकाच्या अचानक निधनाने मोठा धक्का बसला आहे. Divyanka Sirohi Instagram

3 / 5
दिव्यांका सिरोही हरियाणावी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये एक्टिव होती. ती मूळची बुलंदशहरची राहणारी होती. निधनाच्यावेळी ती गाजियाबादमध्ये रहायला होती. गाजियबादमध्येच बुधवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.दिव्यांकाने मेरठच्या चौधरी चरण सिंह युनिवर्सिटीमधून बीसीएची पदवी घेतली होती. तिने सिक्किममधून एमबीएची डिग्री घेतली होती. तिला दोन भाऊ आहेत, हिमांशु आणि दिपांशु, एक बहिण आहे. ती आपल्या सर्व कुटुंबासोबत गाजियाबादमध्ये रहायला होती.  Divyanka Sirohi Instagram

4 / 5
एनडीटीव्हीशी बोलताना दिव्यांका सिरोहीचा नातेवाईक जितेश कुमारने सांगितलं की, दिव्यांकाची तब्येत मंगळवारी चांगली होती. दुपारी जेवण तिनेच बनवलं. संध्याकाळी सातच्या आसपास तिची तब्येत बिघडली. भाऊ संध्याकाळी घराबाहेर होता. रात्री दहावाजता तो घरी आला, त्यावेळी त्याने पाहिलं की, दिव्यांकाची तब्येत बिघडली आहे.  Divyanka Sirohi Instagram

5 / 5
जितेश कुमारने सांगितलं की, दिव्यांकाचे हात-पाय आकडलेले होते. सर्व शरीर निळं पडलेलं. रुग्णालयात घेऊन जाण्याआधी तिचा मृत्यू झाला. तिच्या डोक्याला सूज होती. हार्ट अटॅक आला किंवा अन्य कुठल्या कारणांमुळे मृत्यू झाला. बुधवारी सकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. Divyanka Sirohi Instagram

Follow Us