Vladimir Putin : रशियात पुतिन यांच्याविरोधात जो बोलतो तो गायब होतो पण ते या मॉडलसमोर झुकले, सरकारला द्यावं लागलं स्पष्टीकरण

Vladimir Putin : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन विरोधकांचा खेळ संपवण्यात माहिर आहेत. पण पहिल्यांदा पुतिन यांना, एक मॉडेल त्यांच्याविरोधात बोलली, ते स्वीकार करावं लागलं आहे. कोण आहे विक्टोरिया बोन्याने?.

| Updated on: Apr 20, 2026 | 3:12 PM
1 / 5
राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची रशियामध्ये एकहाती सत्ता आहे. सत्तेवर त्यांची मजबूत पकड आहे. रशियात पुतिन यांच्या विरोधात बोलण्याची कोणी हिम्मत दाखवत नाही. कोणी बोललचं तर तो मरते किंवा गायब होतो. या लिस्टमध्ये  एलेक्स नवेलनी, बोरिस नेमतसोव, येवगेने प्रिगोझिन ही नावं आहेत.  (Getty Images)

2 / 5
अलीकडेच लेखक इल्या रेमेस्लो यांनी पुतिन यांच्यावर टीका केली तर रशियाने त्यांना वेडं घोषित केलं. पण पहिल्यांदा एका महिला ब्लॉगच्या टीकेने रशियन राष्ट्रपतींच टेन्शन वाढवलं आहे. राष्ट्रपती कार्यालय क्रेमलिनला पहिल्यांदा ही टीका स्वीकार करावी लागली आहे. (Getty Images)

3 / 5
 रशियाची प्रसिद्ध व्हिडिओ ब्लॉगर विक्टोरिया बोन्याने सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात तिने लिहिलं की, "राष्ट्रपती लोक तुम्हाला घाबरतात. म्हणून तुमच्याविरोधात काही बोलू शकत नाहीत. मी बोलण्याची हिम्मत करतेय. रशियाचे सर्वसामान्य नागरिक देगेस्तानमध्ये पूर, काळ्या सागराच्या किनाऱ्यावर तेल प्रदूषण, सायबेरियात मोठ्या प्रमाणात पशूंची हत्या. इंटरनेट ब्लॅकआऊट आणि करांमुळे छोट्या व्यवसायांवर दबाव वाढतोय" (Getty Images)

4 / 5
इन्स्टाग्रामवर तिच्या या व्हिडिओला 26 लाख व्यूज मिळाले. त्याची चर्चा सगळ्या युरोपमध्ये आहे. रशियन राष्ट्रपती कार्यालयाने या मुद्यांकडे लक्ष देऊ असं म्हटलं आहे. पुतिन यांचे प्रवक्ते दमित्री पेस्कोव यांनी आम्ही सतत यावर काम करतोय असं म्हटलं आहे. (Getty Images)

5 / 5
46 वर्षांची विक्टोरिया बोन्या रशियाची प्रसिद्ध व्हिडिओ ब्लॉग आणि मॉडलं आहे. 2006 साली बोन्याला पहिल्यांदा एका रियलिटी शो द्वारे रशियात प्रसिद्धी मिळाली होती. इन्स्टाग्रामवर बोन्याचे 13 मिलियन फॉलोअर्स आहेत. 2004 साली ग्रॅज्युएशनची डिग्री घेतल्यानंतर तिने मॉडलिंगच्या विश्वात पाऊल ठेवलं. (Getty Images)

Follow Us