Matka King : काळ्या धंद्यातील इमानदारीचा बादशाह, मटक्याचं साम्राज्य उभं करणारा रतन खत्री कोण?

प्राइम व्हिडीओवर 'मटका किंग' ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यामध्ये विजय वर्मा मुख्य भूमिका साकारत असून सोशल मीडियावर सध्या याच सीरिजची चर्चा होत आहे. या सीरिजमुळे खरा मटका किंग कोण होता, हे जाणून घेण्याची उत्सुकता नेटकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

| Updated on: Apr 20, 2026 | 2:29 PM
1 / 5
विजय वर्माची मुख्य भूमिका असलेली 'मटका किंग' ही वेब सीरिज सध्या प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होत आहे. या सीरिजमध्ये विजयने ब्रिज भट्टीच्या नावाची भूमिका साकारली आहे, जो 1960 च्या दशकात मुंबईत जुगाराचं रॅकेट चालवत असतो. 'मटका किंग' ही सीरिज जुगाराचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रतन खत्रीच्या आयुष्यावर आधारित आहे.

2 / 5
ही सीरिज प्रदर्शित झाल्यापासून नेटकऱ्यांमध्ये खरा मटका किंग कोण हे जाणून घेण्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित या सीरिजचे एकूण आठ एपिसोड्स आहेत. रतन खत्री हा भारतीय जुगाराचा बादशाह आणि चित्रपट निर्माता होता. मटका किंग म्हणून तो सर्वत्र ओळखला जात होता. कारण मटका या जुगाराच्या प्रकाराला त्याने भारतातील सर्वांत फायदेशीर धंदा बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

3 / 5
ब्रिटिशांच्या भारतात त्याचा कराचीमध्ये जन्म झाला होता. 1947 च्या फाळणीदरम्यान तो मुंबईत आला. त्यानंतर त्याने संपूर्ण देशभरात जुगाराचा एक असा नेटवर्क उभा केला, ज्याची सर्वत्र चर्चा झाली. 1970 च्या दशकापर्यंत रतन खत्री हे देशातील सर्वांत मोठं नाव बनलं होतं. त्याचं दररोजचं टर्नओव्हर 1 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं होतं, असं म्हटलं जातं.

4 / 5
त्याच्या ग्राहकांमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी आणि प्रतिष्ठित व्यावसायिकांसह सर्व स्तरांतील लोकांचा समावेश होता. परंतु भारतातील आणीबाणीच्या काळात त्याला अडचणींचा सामना करावा लागला होता. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्याला 19 महिन्यांसाठी तुरुंगात टाकलं होतं.

5 / 5
'मटका किंग' या वेब सीरिजमध्ये रतन खत्रीचं व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवन, तसंच आणीबाणीचा काळ दाखवला आहे. यामध्ये विजय वर्मासोबत सई ताम्हणकर, कृतिका कामरा, गुलशन ग्रोव्हर आणि सिद्धार्थ जाधव यांच्या भूमिका आहेत.

Follow Us