‘देऊळ बंद 2’मध्ये स्वामी समर्थांच्या भूमिकेत कोण? फोटो पाहताच नेटकरी खुश!

'देऊळबंद' या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात स्वामी समर्थांची भूमिका कोण साकारणार, यावरून पडदा उचलण्यात आला आहे. पहिल्या भागात मोहन जोशी यांनी भूमिका साकारली होती.

| Updated on: Apr 12, 2026 | 10:09 AM
1 / 5
2015 मध्ये 'देऊळ बंद' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा, किंबहुना विज्ञानाचा आत्मा हा अध्यात्म आहे हे अधोरेखित करणाऱ्या तसंच श्री स्वामी समर्थ महाराज आणि वैज्ञानिक यांच्याभोवती फिरणाऱ्या कथेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती.

2015 मध्ये 'देऊळ बंद' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा, किंबहुना विज्ञानाचा आत्मा हा अध्यात्म आहे हे अधोरेखित करणाऱ्या तसंच श्री स्वामी समर्थ महाराज आणि वैज्ञानिक यांच्याभोवती फिरणाऱ्या कथेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती.

2 / 5

आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी काही दिवसांपूर्वीच या सीक्वेलची घोषणा केली होती. त्यानंतर आता चित्रपटातील एका महत्त्वाच्या भूमिकेवरून पडदा उचलण्यात आला आहे.

3 / 5

ही भूमिका आहे स्वामी समर्थांची. पहिल्या भागात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी स्वामींची भूमिका साकारली होती. आता दुसऱ्या भागात कोण ही भूमिका साकारणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. अखेर प्रवीण तरडेनं या भूमिकेवरून पडदा उचलला आहे.

4 / 5

11 वर्षांनंतर स्वामी पुन्हा अवतरलेत, पटकन दर्शन घ्या.. देऊळ पुन्हा बंद होऊ शकतं, असं कॅप्शन देत प्रवीण तरडेनं स्वामी समर्थांची झलक दाखवली. 'देऊळबंद 2'मध्ये पुन्हा एकदा मोहन जोशीच ही भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं.

5 / 5

‘आता परीक्षा देवाची..’ या टॅगलाइनसह या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला होता. त्यामुळे भक्तांसाठी देवाला कोणती परीक्षा द्यावी लागणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. तसंच मोहन जोशींव्यतिरिक्त कोणते कलाकार कुठल्या भूमिकेत असणार आहेत, हे अद्याप गुलदस्तात असल्याने ते जाणण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us