विमानाच्या खिडक्या गोलाकार का असतात? 99 टक्के प्रवाशांना माहिती नाही कारण
विमानाच्या खिडक्या चौकोनी नसून गोलाकार कडा असलेल्या का असतात? जाणून घ्या यामागचे महत्त्वाचे कारण! ऐकून व्हाल चकित.

विमानाने प्रवास करताना तुम्ही एक गोष्ट नक्कीच पाहिली असेल, ती म्हणजे विमानाच्या खिडक्या चौकोनी नसून गोलाकार किंवा अंडाकृती कडा असलेल्या असतात. यामागे केवळ आकर्षक डिझाइन नसून प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाचे वैज्ञानिक कारण आहे.
विमान हवेत उडत असताना त्याच्या आतील केबिनमधील हवेचा दाब आणि बाहेरील वातावरणाचा दाब यामध्ये फरक असतो. त्यामुळे विमानाच्या शरीरावर वारंवार ताण निर्माण होतो.
चौकोनी खिडक्यांच्या टोकदार कोपऱ्यांवर हा ताण अधिक प्रमाणात केंद्रित होऊ शकतो. परिणामी, त्या ठिकाणी बारीक भेगा निर्माण होण्याचा आणि त्या वाढण्याचा धोका असतो.
1950 च्या दशकात ब्रिटनच्या डी हॅविलँड कॉमेट या प्रवासी विमानाला हवेत गंभीर अपघातांना सामोरे जावे लागले. तपासात विमानाच्या चौकोनी खिडक्यांच्या कोपऱ्यांजवळ ताण केंद्रित होऊन धातूमध्ये भेगा निर्माण होण्याची समस्या समोर आली.
या घटनांमुळे विमानाच्या रचनेत खिडक्यांचा आकार आणि त्यांची मजबुती किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट झाले. त्यामुळे गोलाकार किंवा अंडाकृती कडा असलेल्या खिडक्यांमध्ये टोकदार कोपरे नसतात.