बिअरच्या बाटल्या हिरव्या किंवा तपकिरीच का असतात? व्होडकाची बाटली मात्र पारदर्शक; जाणून घ्या कारण!

दारू , वाईन किंवा बीअर, त्यासाठी केवळ गडद रंगाच्या बाटल्यांचाच वापर केला जातो, उदा- हिरवी, काळी किंवा ब्राऊन. पण यामागचं कारण तरी काय ?

| Updated on: Oct 16, 2026 | 7:41 PM
1 / 5
कोणत्याही लिकर शॉपमध्ये बिअर किंवा दारूच्या इतर बाटल्यांवर नजर टाकली तर बहुतांश बाटल्या या हिरव्या किंवा ब्राऊन रंगाच्या दिसतील. वाईनच्या बॉटल्स तर बहुतांश गहिऱ्या रंगाची असतो, तर व्होडका आणि जिनची बातली पारदर्शक असते. हे फक्त डिझाइन किंवा पॅकिंग पुरतं मर्यादित नाही. तर त्यामागे विज्ञान, इतिहास आणि व्यापार, तिघांच्याही भूमिका आहेत. यामागचं खरं कारण काय, घ्या जाणून.. ( All Photos : Pexels)

कोणत्याही लिकर शॉपमध्ये बिअर किंवा दारूच्या इतर बाटल्यांवर नजर टाकली तर बहुतांश बाटल्या या हिरव्या किंवा ब्राऊन रंगाच्या दिसतील. वाईनच्या बॉटल्स तर बहुतांश गहिऱ्या रंगाची असतो, तर व्होडका आणि जिनची बातली पारदर्शक असते. हे फक्त डिझाइन किंवा पॅकिंग पुरतं मर्यादित नाही. तर त्यामागे विज्ञान, इतिहास आणि व्यापार, तिघांच्याही भूमिका आहेत. यामागचं खरं कारण काय, घ्या जाणून.. ( All Photos : Pexels)

2 / 5

बिअरचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे सूर्यप्रकाश किंवा तीव्र कृत्रिम प्रकाश. बिअरमध्ये हॉप्सपासून मिळणारी काही रासायनिक संयुगे आणि व्हिटॅमिन B2 (रायबोफ्लेविन) असते. प्रकाशाच्या, विशेषतः अल्ट्राव्हायोलेट आणि निळ्या-जांभळ्या किरणांच्या संपर्कात आल्यावर या घटकांमध्ये रासायनिक अभिक्रिया होते. यामुळे एक सल्फरयुक्त संयुग तयार होते, ज्याला तीव्र आणि उग्र वास असतो. अशा बिअरला ‘लाइट-स्ट्रक’ किंवा ‘स्कंक्ड’ बिअर असे म्हणतात. कडक उन्हात हा बदल अगदी कमी वेळात सुरू होऊ शकतो.

3 / 5

वाइनची चवही प्रकाशामुळे बिघडू शकते. विशेषतः हलक्या प्रकारच्या आणि स्पार्कलिंग वाइनवर याचा परिणाम अधिक दिसून येतो. काचेचा रंग त्यात मिसळलेल्या खनिजांवर अवलंबून असतो. तपकिरी (अंबर) रंगाच्या काचेमध्ये लोह, सल्फर आणि कार्बन यांसारख्या घटकांचा वापर केला जातो. ही काच हानिकारक अतिनील किरणे आणि निळ्या-जांभळ्या प्रकाशाचा मोठा भाग रोखते. त्यामुळे बिअरसाठी तपकिरी बाटली हा सर्वात विश्वासार्ह पर्याय मानला जातो.

4 / 5

यामागे ऐतिहासिक कारण आहे. पूर्वी काच तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाळूमध्ये नैसर्गिकरीत्या लोखंडाची अशुद्धता असायची. त्यामुळे काचेला अनेकदा फिकट हिरवा रंग मिळत असे. आयर्न ऑक्साइड आणि क्रोमियम यांसारख्या घटकांचा वापर करून काचेला गडद हिरवा रंगही देता येतो. हिरव्या रंगाची काच काही प्रमाणात अतिनील किरणे रोखते; मात्र तपकिरी काचेइतकी प्रभावी नसते. त्यामुळे हिरव्या बाटलीतील बिअरला स्कंकसारखा उग्र वास येण्याचा धोका अधिक असतो. तरीही अनेक ब्रँड्सनी हिरव्या बाटलीला आपली खास ओळख बनवले आहे आणि ते त्यात बदल करू इच्छित नाहीत.

5 / 5

व्होडकाच्या बाटल्या पारदर्शक किंवा रंगीत असण्यामागे त्यातील पेय प्रकाशासाठी किती संवेदनशील आहे, हे एक महत्त्वाचे कारण असते. व्होडका हे रंगहीन पेय आहे आणि सामान्यतः प्रकाशामुळे त्याच्या चवीवर बिअरइतका सहज परिणाम होत नाही. पारदर्शक बाटलीमुळे पेयाची शुद्धता आणि स्वच्छ स्वरूप दिसून येते. त्यामुळे व्होडका सहसा पारदर्शक किंवा रंगहीन काचेच्या बाटल्यांमध्ये पॅक करण्यात येते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us