GK : झुरळाचे रक्त लाल रंगाचे का नसते? नेमकं कारण वाचून नवल वाटेल!

मनाव तसेच इतर प्राण्यांच्या रक्ताचा रंग हा लाल असतो. परंतु झुरळाचे रक्त लाल नसते. यामागचे नेमके कारण अनेकांना माहिती नाही. त्यामुळेच झुरळाचे रक्त लाल का नसते, ते जाणून घेऊ या....

| Updated on: Apr 19, 2026 | 9:21 PM
1 / 5
झुरळ पाहिलं की प्रत्येकालाच चीड येते. घरात एकदा झुरळ झाले की नंतर मात्र खूप डोकेदुखी वाढते. किचन, बेडरुम तसेच इतर ठिकाणी सगळीकडेच झुरळ दिसायला लागतात. तुम्ही झुरळांना कितीही मारले तरीही ते पुन्हा होतातच.

झुरळ पाहिलं की प्रत्येकालाच चीड येते. घरात एकदा झुरळ झाले की नंतर मात्र खूप डोकेदुखी वाढते. किचन, बेडरुम तसेच इतर ठिकाणी सगळीकडेच झुरळ दिसायला लागतात. तुम्ही झुरळांना कितीही मारले तरीही ते पुन्हा होतातच.

2 / 5

झुरळाबद्दल तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतल्या आहेत का. तुम्ही रागात एखाद्या वेळी झुरळाला मारून पाहिले असेल तर झुरळाचे रक्त लाल नसते हे लक्षात येईल. झुरळाचे रक्त रंगहीन असते.

3 / 5

मानवाचे आणि प्राण्यांच्या रक्ताचा रंग लाल असतो. परंतु झुरळाच्या रक्ताचा रंग हा लाल नसतो. असे नेमके का असते ते जाणून घेऊ या. यामागचं विज्ञान समजून घेऊ या. मानवाच्या रक्तामध्ये हिमोग्लोबीन नावाचा एक घटक असतो.

4 / 5

हिमोग्लोबीनमुळेच मानवी रक्ताला लाल रंग येतो. परंतु झुरळाच्या रक्तामध्ये हिमोग्लोबीन नसते. परिणामी त्याचे रक्त हे रंगहीन असते. हिमोग्लोबीन नसल्यानेच झुरळाचे रक्ते हे लाल नसते.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us