महिलांच्या ड्रेसच्या आत या स्ट्रिप्स का असतात? 99 टक्के महिलांना माहिती नाही खरं कारण
महिलांच्या ड्रेसमध्ये असणाऱ्या छोट्या स्ट्रिप्सचा नेमका उपयोग काय? अनेक महिला हे कापूनच टाकतात. पण ते का दिलेलं असतं? जाणून घ्या सविस्तर

महिलांच्या ड्रेसच्या आतील बाजूला, विशेषतः खांद्याजवळ किंवा कमरेच्या भागात सॅटिन, नायलॉन किंवा प्लास्टिकच्या छोट्या स्ट्रिप्स नेहमी दिसतात. पण अनेकांना या स्ट्रिप्स केवळ डिझाइन किंवा फॅशनचा भाग वाटतात. मात्र, प्रत्यक्षात त्यांचा उपयोग कपडे व्यवस्थित जतन करण्यासाठी केला जातो.

या स्ट्रिप्सना तांत्रिक भाषेत ‘हँगर लूप्स’ असे म्हटले जाते. त्यांचे मुख्य काम म्हणजे ड्रेस हँगरवर सुरक्षितपणे टांगून ठेवणे. सिल्क, सॅटिन, ऑफ-शोल्डर, स्पॅगेटी स्ट्रॅप किंवा रुंद गळ्याचे कपडे हँगरवरून सहज घसरू शकतात. अशा वेळी हे लूप्स कपड्यांना स्थिर ठेवण्यास मदत करतात.

याशिवाय, नाजूक फॅब्रिकचे कपडे थेट हँगरवर टांगल्यास खांद्याच्या भागात ताण येऊन त्यांचा आकार बदलू शकतो. हँगर लूप्समुळे कपड्यांचा मूळ आकार टिकून राहतो आणि फॅब्रिकचे नुकसान होण्याची शक्यता कमी होते.

साधारणपणे ड्रेसच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक लूप दिलेला असतो, ज्यामुळे तो हँगरच्या दोन्ही टोकांना अडकवता येतो. त्यामुळे कपडे घसरत नाहीत आणि त्यांची गुणवत्ता अधिक काळ टिकून राहते.

अनेक मुली ड्रेस घालताना हे लूप्स बाहेर दिसतात किंवा अडथळा निर्माण करतात म्हणून कापून टाकतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते ते कापण्याऐवजी ड्रेसच्या आत व्यवस्थित ठेवणे किंवा गरज असल्यास छोट्या सेफ्टी पिनच्या मदतीने लपवणे अधिक योग्य ठरते.