Mongoose : जिवंत विषारी साप खाल्ल्यानंतरही मुंगूस जिंवत राहतो; काय आहे वैज्ञानिक कारण?

mongoose : मुंगूस हा जिवंत विषारी साप खाल्ल्यानंतरही जिंवत राहतो, हे कसं घडतं, याबाबत अनेकांना प्रश्न पडतो. हे नेमकं कसं घडतं, वैज्ञानिक कारण काय आहे, जाणून घ्या.

| Updated on: Oct 23, 2026 | 1:54 PM
1 / 5
मुंगूस हा विषार साप चावल्यानंतरही जिवंत राहतो. तसेच विषारी साप खाल्ल्यानंतरही मुंगूस कसा जिवंत कसा राहतो, असा अनेकांना प्रश्न पडतो. जाणून घ्या कारण

मुंगूस हा विषार साप चावल्यानंतरही जिवंत राहतो. तसेच विषारी साप खाल्ल्यानंतरही मुंगूस कसा जिवंत कसा राहतो, असा अनेकांना प्रश्न पडतो. जाणून घ्या कारण

2 / 5

खरंतर मुंगूसची रोगप्रतिकारशक्तीची रचना बदलणाऱ्या जनुकीय बदलांशी निगडित आहे. त्याचा थेट फायदा मुंगूसला होता.

3 / 5

सापाच्या विषामध्ये प्रथिने आणि एन्झाइम्सचा समावेश असतो. त्यामुळे पचनक्रियेदरम्यान विघटित घडण्याची शक्यता आहे. मुंगूस विषारी साप खातो, त्यावेळी विष हे रक्तप्रवाहाऐवजी पचनसंस्थेत प्रवेश करते. परंतु विष हे जखमेत शिरल्यास धोकादायक ठरू शकते.

4 / 5

मुंगूसचे केस जाड आणि कडक असतात. त्यामुळे सापाच्या दाताचा मुंगूसच्या त्वचेवर फारसा परिणाम होत नाही. साप हल्ला करताना एक भौतिक अडथळा निर्माण होतो.

5 / 5

मुंगूस खूप चपळ असतो. सापाचे हल्ले चुकवण्यात मुंगूस यशस्वी ठरतो. त्याच्या चपळाईपुढे प्रतिस्पर्धक साप थकून जातो. मुंगस हे सर्व विषारी सापांचं विष पचवू शकत नाही. काही मोजक्या विषारी सापांचा त्याच्यावर परिणाम होत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us