गॅस सिलेंडरच्या तळाशी छोटी छिद्रं का असतात? तुम्हाला आतापर्यंत कोणीही सांगितला नसेल अर्थ

गॅस सिलेंडरच्या तळाशी असलेली छोटी छिद्रे तुमच्या सुरक्षेसाठी किती महत्त्वाची आहेत आणि त्यामागील वैज्ञानिक कारण काय आहे, हे सविस्तर जाणून घ्या.

| Updated on: Apr 05, 2026 | 2:05 PM
1 / 6
आखाती देशातील युद्धामुळे सध्या देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे गॅस सिलेंडर. आजकाल अनेक शहरांमध्ये गॅस पाईपलाईन आली असली, तरी आजही बहुतांश घरांमध्ये सिलेंडरचाच वापर केला जातो.

2 / 6
तुम्ही कधी सिलेंडरकडे बारकाईने पाहिले आहे का? सिलेंडरच्या तळाशी असलेल्या लोखंडी रिंगवर काही लहान छिद्रे (Holes) असतात. अनेकदा आपल्याला वाटते की हे केवळ डिझाइनसाठी आहे, परंतु यामागे एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे.

3 / 6
सिलेंडरमध्ये एलपीजी (LPG) गॅस भरलेला असतो. उन्हाळ्यात किंवा स्वयंपाकघरातील उष्णतेमुळे सिलेंडरचे तापमान वाढण्याची शक्यता असते. अशा वेळी सिलेंडरच्या तळाशी असलेल्या या छिद्रांमधून हवा सतत खेळती राहते. ही हवा सिलेंडरच्या खालच्या भागाचे तापमान संतुलित राखण्यास मदत करते, ज्यामुळे संभाव्य धोका टळतो.

4 / 6
सिलेंडर अनेकदा ओल्या फरशीवर किंवा दमट जागेत ठेवला जातो. जर ही छिद्रे नसती, तर सिलेंडर आणि जमिनीच्या दरम्यान हवा पोहचू शकली नसती आणि तिथे ओलावा साचून राहिला असता.

5 / 6
ओलावा साचल्यामुळे लोखंडी सिलेंडरला लवकर गंज (Rust) लागू शकतो. गंज लागल्यामुळे सिलेंडर कमकुवत होऊन गॅस गळतीची भीती निर्माण होऊ शकते. ही छिद्रे हवा खेळती ठेवून तळभाग कोरडा ठेवण्यास मदत करतात.

6 / 6
सिलेंडरच्या खाली पाणी साचल्यास ते काढणे कठीण होते, मात्र या छिद्रांमुळे पाणी साचत नाही आणि स्वच्छता राखणे सोपे जाते. थोडक्यात, ही छोटी छिद्रे सिलेंडरचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि आपल्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

Follow Us