रात्री ट्रेनमध्ये डोळा लागत नाही? गादी, उशी नाही खरं कारण तर…

रेल्वेने प्रवास करताना रात्री शांत झोप का येत नाही? जाणून घ्या मानवी मेंदू आणि चालत्या गाडीच्या हालचालीशी जोडलेली ही सोपी कारणे.

| Updated on: May 22, 2026 | 1:51 PM
1 / 6
ट्रेनचा प्रवास करायला अनेकांना खूप आवडते. खिडकीबाहेरची दृश्ये पाहणे, चहा पिणे आणि गाडीचा आवाज अनुभवणे यात एक वेगळाच आनंद असतो. पण रात्रीच्या वेळी मात्र अनेक प्रवाशांची पंचाईत होते.

2 / 6
कितीही प्रयत्न केला तरी ट्रेनमध्ये काहींचा डोळा लागत नाही. अनेकांना वाटते की फक्त गादी आरामदायी नसल्यामुळे असे होते. पण यामागे आपल्या मेंदूचे आणि शरीराचे एक वेगळेच शास्त्र आहे.

3 / 6
जेव्हा आपण घर सोडून कोणत्याही नवीन किंवा चालत्या ठिकाणी झोपतो, तेव्हा आपला मेंदू पूर्णपणे शांत होत नाही. त्याला 'फर्स्ट नाईट इफेक्ट' म्हणतात. अशा वेळी मेंदूचा एक भाग आजूबाजूच्या आवाजांवर आणि हालचालींवर लक्ष ठेवून असतो, जेणेकरून काही धोका असल्यास आपल्याला लगेच जागे करता येईल. या सावधतेमुळे आपल्याला गाढ झोप लागत नाही.

4 / 6
चालत्या ट्रेनमध्ये सतत खडखडाट आणि हालचाल सुरू असते. आपण झोपलो तरी आपल्या कानाच्या आतील यंत्रणा या हालचालीची माहिती मेंदूला सतत पाठवत राहते. त्यामुळे शरीराला पूर्ण आराम मिळत नाही. काही लोकांना यामुळे अस्वस्थ वाटू लागते.

5 / 6
ट्रेनमध्ये रात्रीसुद्धा लोकांची ये-जा सुरू असते, कुणीतरी मोबाईलवर बोलत असते किंवा प्रत्येक स्टेशनवर आवाज होत राहतात. तसेच खिडकीबाहेरून येणारा थांब्यांवरील प्रकाश आणि मोबाईलचा उजेड यामुळे डोळ्यांना आणि मनाला शांतता मिळत नाही.

6 / 6
ट्रेनमधील बर्थ हे घराच्या पलंगासारखे मोठे नसतात. विशेषतः वरच्या आणि मधल्या बर्थवर नीट अंग ताणून झोपायला जागा नसते. प्रवासाच्या सुरुवातीला सामान उचलल्यामुळे शरीर थकलेले असते. पण मनातील धावपळ आणि जागेची गैरसोय यामुळे झोप येत नाही.

Follow Us