Earbuds Settings : एका इयरबडमधून आवाज कमी येतोय? आधी ही सेटिंग बदलून पाहा

इयरबड नवा असून देखील अनेकदा एका इयरबडमधून आवाज येण्याचा प्रमाण कमी होतं. त्यामुळे प्रचंड इरिटेट व्हायला होतं. या त्रासाला कंटाळून आपण नवे इयरबड खरेदी करतो. पण तुम्हाला माहित आहे की आवाज वाढवण्यासाठी इयरबड नवा घेण्याची गरज नाही तर आवाजाची सेटिंग बदलण्याची गरज आहे. जाणून घ्या कशी

| Updated on: Oct 28, 2026 | 9:54 PM
1 / 6
गाणी ऐकताना किंवा फोनवर बोलताना एका इयरबडचा आवाज व्यवस्थित येतो पण दुसऱ्याचा आवाज अगदी कमी ऐकू येतो. अशावेळी अनेक जण इयरबड खराब झाला समजून नवीन खरेदी करण्याचा विचार करतात. पण थांबा प्रत्येक वेळी इयरबड  खराब झाला असतो असं नाही,  तर कधी मोबाईलच्या सेटिंग मध्ये बदल झालेला असतो त्यामुळे पैसे खर्च करण्याआधी पाच उपाय करून पहा

गाणी ऐकताना किंवा फोनवर बोलताना एका इयरबडचा आवाज व्यवस्थित येतो पण दुसऱ्याचा आवाज अगदी कमी ऐकू येतो. अशावेळी अनेक जण इयरबड खराब झाला समजून नवीन खरेदी करण्याचा विचार करतात. पण थांबा प्रत्येक वेळी इयरबड खराब झाला असतो असं नाही, तर कधी मोबाईलच्या सेटिंग मध्ये बदल झालेला असतो त्यामुळे पैसे खर्च करण्याआधी पाच उपाय करून पहा

2 / 6

इयरबडचा नियमित वापर केल्यामुळे त्याच्या स्पीकरच्या जाळीत धूळ आणि कानातील मळ साचू शकतो. त्यामुळे त्याचा आवाज कमी ऐकू येतो. त्यासाठी कोरडा ब्रश किंवा कापड वापरून जाळी हलक्या हाताने पुसून स्वच्छ करा. सुई पिन किंवा टाचणी टोकदार वस्तू वापरू नका. इयरबडवर थेट पाणी टाकू नका

3 / 6

मोबाईल मध्ये कधी कधी डाव्या किंवा आणि उजव्या बाजूच्या आवाजाचा संतुलन बिघडलेलं असतं. त्यामुळे एका इयरबडचा आवाज कमी येऊ शकतो मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन एक्सेसिबिलिटी किंवा ऑडिओ विभागातील बॅलन्स पर्याय तपासा स्लाइडर मध्यभागी असल्याची खात्री करा.

4 / 6

इयरबडचा आवाज कमी येत असेल तर मोबाईलचा ब्लूटूथ बंद करून पुन्हा सुरू करा तरी फरक पडला नाही तर ब्लूटूथ सेटिंग मधून कनेक्शन काढून पुन्हा जोडा किंवा ब्लूटूथ सेटिंग मध्ये आवाजाचा बॅलन्स नीट आहे ना हे तपासा

5 / 6

इयरबडची बॅटरी कमी असल्यामुळे हे काही मॉडेलमध्ये आवाज किंवा कनेक्शनशी संबंधित समस्या जाणवू शकतात दोन्ही इयरबड चार्जिंग केस मध्ये ठेवा आणि ते व्यवस्थित चार्ज झाले आहेत की नाही हे तपासा.

6 / 6

वरील उपाय करूनही आवाज कमी येत असेल इयरबडचा दुसऱ्या मोबाईलला जोडून पहा, तिथे आवाज व्यवस्थित येत असेल तर तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये गडबड असू शकते. दुसऱ्या उपकरणावरही आवाज कमी येत असेल तर इयरबडमध्ये बिघाड झाल्याची शक्यता असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us