
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आता क्रिकेटच्या मैदानाच्या पेक्षा कुटुंबासोत जास्त वेळ घालवताना दिसतो. विराट कोहली सध्या लंडनमध्ये आहे. तिथे तो रस्त्यावर फिरताना, शॉपिंग करताना दिसला. (PC-PTI)

विराट कोहलीसाठी हे आयुष्य स्वप्नापेक्षा कमी नाहीय. कारण विराट कोहली बंद खोलीत राहून वैतागलेला. विराट कोहलीने आपल्या करिअरमध्ये जास्त वेळ फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घालवला आहे. त्याच्यासाठी हे फाईव्ह स्टार हॉटेल जेलपेक्षा कमी नाही. (PC-PTI)

विराट कोहलीने फाईव्ह स्टार हॉटेलला रॉयल जेल म्हटलं होतं. ईएसपीएनला दिलेल्या इंटरव्यूमध्ये विराट म्हणालेला की, ती एक रॉयल जेल आहे. तिथे तुम्ही काही करु शकत नाही.(PC-PTI)

विराट कोहली म्हणालेला की, मी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये खायला जाऊ शकत नाही. हॉटेलच्या बाहेर जाणं दूर राहिलं, सर्वकाही आपल्या खोलीत ऑर्डर करावं लागतं. तिथेच बसून डिनर करावा लागतो. (PC-PTI)

विराट कोहली एका इंटरव्यूमध्ये हे सुद्धा म्हणालेला की, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी तरसतो. म्हणूनच कदाचित हा खेळाडू सध्या भारतापेक्षा पण जास्त वेळ इंग्लंडमध्ये घालवतो.(PC-PTI)