नव्याकोऱ्या कारवर स्वास्तिक का काढले जाते? नेमकं लॉजिक समजताच वाटेल नवल!

भारतीय संस्कृतीत कोणतीही नवी वस्तू घरात आणण्याआधी त्या वस्तूची पूजा करणे शुभ मानले जाते. घरात नवी वस्तू आणण्याआधी देवाचे स्मरण केले जाते. ज्योतिषशास्त्रात वाहनाचा संबंध यात्रेशी जोडण्यात आलेला आहे.

| Updated on: May 24, 2026 | 9:20 PM
1 / 5
हिंदू धर्मात स्वास्तिकाला खूप महत्त्व आहे. लग्न समारंभ, वास्तूशांती, गृहप्रवेश अशा वेगवेगळ्या शुभ कार्यक्रमात स्वास्तिक आवर्जुन काढतात. परंतु नव्या कारवर स्वास्तिक का काढतात? ते जाणून घेऊ या...

हिंदू धर्मात स्वास्तिकाला खूप महत्त्व आहे. लग्न समारंभ, वास्तूशांती, गृहप्रवेश अशा वेगवेगळ्या शुभ कार्यक्रमात स्वास्तिक आवर्जुन काढतात. परंतु नव्या कारवर स्वास्तिक का काढतात? ते जाणून घेऊ या...

2 / 5

भारतीय संस्कृतीत कोणतीही नवी वस्तू घरात आणण्याआधी त्या वस्तूची पूजा करणे शुभ मानले जाते. घरात नवी वस्तू आणण्याआधी देवाचे स्मरण केले जाते. ज्योतिषशास्त्रात वाहनाचा संबंध यात्रेशी जोडण्यात आलेला आहे.

3 / 5

त्यामुळेच घरात नवी गाडी आणली की गाडीपुढे नारळ फोडले जाते. त्या गाडीचा पूजा केली जाते. गाडीची पूजा करताना गाडीवर स्वास्तिकदेखील काढले जाते. कारण स्वास्तिक हे अत्यंत शुभ मानले जाते.

4 / 5

स्वास्तिक हे समृद्धीचे प्रतिक असते. स्वास्तिकामुळे नकारात्मक उर्जा नाहिशी होते. भविष्यातील यात्रादेखील सुरक्षित होते असे मानले जाते. त्यामुळेच घरात नवी गाडी आणण्याआधी त्यावर स्वास्तिक काढले जाते.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us