
सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. यामध्ये एखाद्या अभिनेत्रीचे सौंदर्य असेल किंवा अभिनय असेल. पण सध्या एक मॉडेल प्रचंड चर्चेत आली आहे. तिचे गाल जगातील सर्वात मोठे गाल असल्याचा ती दावा करत आहे.

यूक्रेनची मॉडेल अनास्तासिया पोक्रेशचुक आपल्या वेगळ्या आणि अनोख्या लुकमुळे जगभरात चर्चेत आली आहे. तिचे गाल हे जगातील सर्वात मोठे असल्याचा ती सांगते. जे तिने फिलर्स आणि सर्जरीद्वारे तयार केले आहेत. तिचा हा वेगळा चेहरा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लाखो लोक तिला फॉलो करतात.

अलीकडेच अनास्तासियाने तिचे 9 वर्षांपूर्वीचे फोटो शेअर केले, ज्यामुळे अनेकजण थक्क झाले. 2017 मधील या फोटोंमध्ये ती पूर्णपणे वेगळी दिसत होती. त्या काळात तिचे गाल सामान्य होते, लांब सोनेरी केस होते आणि तिचा लुक एक फिटनेसप्रेमी मुलीसारखा होता.

तिचा तो नैसर्गिक आणि साधा चेहरा आजच्या लुकशी तुलना करता ओळखूही येत नाही. अनास्तासियाने 26 व्या वर्षापासून कॉस्मेटिक ट्रीटमेंट घेण्यास सुरुवात केली. तिने हळूहळू गाल, जबडा आणि ओठांमध्ये फिलर्स केले. याशिवाय बोटॉक्स, ब्रेस्ट इम्प्लांटसह अनेक सर्जरी करून तिने आपला चेहराच बदलून टाकला.

सोशल मीडियावर तिच्या जुन्या फोटोंवर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी ती आधी अधिक सुंदर आणि नैसर्गिक दिसत होती असे मत व्यक्त केले. पण तिच्या मते, तिचा चेहरा आणि तिचं आयुष्य असल्याने कसं दिसायचं हे ठरवण्याचा अधिकार तिचाच आहे.