
जगभरात मासे खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. अनेक प्रकारच्या माशांची चव चाखण्यासाठी खवय्ये उत्सुक असतात. शिवाय कोणत्या बाजारात सर्वात जास्त माशांचे प्रकार आहेत आणि कोणतं फिश मार्केट सर्वात जास्त मोठं आहे... अशी चर्चा देखील कायम मासे प्रेमींमध्ये रंगलेली असते...

त्यामुळे आज जाणून घ्या जगातील सर्वात मोठं फिश मार्केट नक्की कुठे आहे. जगातील सर्वात मोठं फिश मार्केट जापान या देशात आहे. उपलब्ध माहितीनुसार, जापानची राजधानी टोक्यो येथील सुकिजी याठिकाणी जगातील सर्वांत मोठं फिश मार्केट आहे.

जापानच्या सुकिजी येथील बाजार एक होलसेल मार्केट आहे. सुकिजी याठिकाणी असलेला बाजार समुद्रातील जीव आणि माशांसाठी प्रसिद्ध आहे. मासे खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये खवय्यांची गर्दी पाहायला मिळते.

रिपोर्टनुसार, सुकिजी येथे असलेल्या मार्केटमध्ये प्रत्येक दिवशी 2000 मीट्रिक टन सीफूड विक्री होतो. मिळालेल्या माहितीनुसार, हे मार्केट 1935 पासून सुरु आहे. अनेक मासेप्रेमी पर्यटक देखील सुकिजी मार्केटला भेट देतात.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्केट पूर्वी निहोनबशी नदी किनारी होता. येथे मासे खरेदी करण्यासाठी बोली लावली जायची... ही बोली सकाळी 5.30 ते 10 वाजे पर्यंत सुरु असायची... मार्केटचे फोटो आणि व्हिडीओ जेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.