Dahi Handi 2026 : ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम; तरुणाईचा उत्साह शिगेला, मुख्यमंत्र्यांसह सेलिब्रिटी दहीहंडीत
Dahi Handi : राज्यात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. अनेक ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं असून दहीहंडीला मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार पाहायला मिळत आहे. आता सेलिब्रिटी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दहीहंडीला हजेरी लावली. परिवर्तन दहीहंडी, जांबोरी मैदानात मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली आणि दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या.
मुंबई माझी जन्म कर्म भूमी आहे. त्यामुळे मला मराठी बोलायला लागणार मला मराठी बोलायला आवडतं... मी माझ्या कर्मचाऱ्यांसोबत देखील मराठी मध्ये बोलतो.. काही वेळा मीडिया समोर मराठी बोलायला भीती वाटते मात्र मी मराठी बोलतो.. असं सुनील शेट्टी म्हणाले.
अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी देखील घाटकोपर येथील गणेश चुक्कल यांच्या दहीहंडीत उपस्थित होते. यावेळी रितेश - जिनिलिया यांनी सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छ दिल्या.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू सु्र्य कुमार यादव याने देखील दहीहंडी उपस्थित राहिला. त्याचासमोर शिवगणेश पथकाकडून 9 थरांची दहीहंडी रचण्यात आली. यावेळी त्याने सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या.