फेमस युट्यूबरला रस्त्यावर मोमोज खाणे पडलं महागात; करणी सेनेची थेट पोलिसांत धाव, नेमकं प्रकरण काय?
उत्तराखंडमधील फेमस युट्यूबर नीतूला रस्त्यावर मोमोज खाणे महागात पडलं आहे. करणी सेनेने या युट्युबरच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भारतात चायनीज भेळनंतर आता मोमोज पदार्थ अनेकांच्या पसंतीचा ठरू लागला आहे. भारतातील विविध शहरातील कानाकोपऱ्यात मोमोजचे दुकान पाहायला मिळतात. शहरातील कोणत्याही रस्त्यावर तरुण मुलं मोमोज खाताना दिसतात. परंतु रस्त्यावर उभे राहून मोमोज खाणे एका युट्यूबरला महागात पडलं आहे.
कारण तिने काली मातेच्या वेशात रस्त्यावर मोमोज खाल्ले. त्यामुळे काली देवीचा अपमान आणि सनातन धर्माच्या भावना दुखावल्या आरोप करणी सेनेना केला. त्यानंतर करणी सेनेने हल्दानी पोलीस ठाण्यात इन्फ्लुएन्सविरोधात तक्रार दिली.
नीतू बिस्ट या उत्तराखंडमधील फेमस युट्युबर आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 5.6 लाख फॉलोवर्स आहेत. मागील काही दिवसांत तिच्या बिग बॉस एन्ट्रीची जोरदार चर्चा रंगली होती.
करणीने नीतू बिस्टच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. हल्दानीमध्ये करणी सेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष योगिता बनौला यांनी तक्रार दिली आहे. देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप करणी सेनेच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे. त्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
करणी सेनेने पोलिसांना तक्रार अर्ज सोपवला आहे. त्यांनी आयटी अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे. तिला सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. त्यामुळे तिने शेअर केलेल्या व्हिडिओमुळे अवमान झाल्याचा दावा केला आहे. या कृतीला तीच जबाबदार असल्याचा दावा करणी सेनेचा आहे.