शिवरायांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मंगलप्रभात लोढा यांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

| Updated on: Nov 30, 2022 | 2:42 PM

वादानंतर लोढा यांचं स्पष्टीकरण, म्हणाले...

शिवरायांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मंगलप्रभात लोढा यांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Follow us on

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं छत्रपती शिवरायांवरील (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण ताजं असतानाच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांच्या या विधानानंतर वाद निर्माण झालाय. अनेकांनी लोढा यांच्या या विधानाना निषेध केलाय. या सगळ्या टीकेनंतर लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी आपल्या विधानाचं स्पष्टीकरण दिलंय.

लोढा यांचं स्पष्टीकरण

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली नाही. तर जो प्रसंग घडला याची तुलना केली. केवळ त्या प्रसंगातील साधर्म्य दाखवण्याचा माझा प्रयत्न होता, असं मंगलप्रभात लोढा म्हणालेत.

लोढा यांचं विधान काय?

औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कुणीतरी डांबून ठेवलं होतं पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे.

आज शिवप्रतापदिन आहे. त्यानिमित्त प्रतापरगडावर कार्यक्रमाचं आयोजवन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. यावेळी बोलताना मंगलप्रभात लोढा विधान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेशी केली.

मंगलप्रभात यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून टीका होतेय. अजित पवार, अमोल कोल्हे, आदित्य ठाकरे, अमोल मिटकरी यांनी मंगल प्रभात लोढा यांच्या विधानाचा तीव्र निषेध केलाय. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीची तुलना शिवरायांच्या प्रतापाशी होऊ शकत नाही, असा या नेत्यांचा एकसूर पाहायला मिळतोय.