शरद पवार साखरेपेक्षाही गोड, गडकरी तर रोडकरी; राज्यपाल भगतसिंह सुस्साट

| Updated on: Nov 19, 2022 | 3:41 PM

राज्यपालांकडून पवार, गडकरींचं कौतुक, पाहा काय म्हणाले...

शरद पवार साखरेपेक्षाही गोड, गडकरी तर रोडकरी; राज्यपाल भगतसिंह सुस्साट
Follow us on

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पदवीदान समारोह आज पार पडला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजप नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डी.लिट पदवी प्रदान करण्याच आली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार आणि नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं कौतुक केलंय.

शरद पवार एक वेगळं रसायन आहे. त्यांना कितीही राग आला तरी ते साखरेपेक्षा गोड राहतात. लोकांशी प्रेमानेच वागतात, असं भगतसिंह कोश्यारी म्हणालेत.

तर गडकरी यांनी रस्ते विकासात एवढं काम केलंय की लोक त्यांना आता गडकरी ऐवजी ‘रोडकरी’ म्हणतात, असं कोश्यारी म्हणालेत.

याच कार्यक्रमात बोलताना कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक विधान केलं. त्याची जोरदार चर्चा होतेय.

कोश्यारींचं विधान

तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.