Shirdi : मुख्यमंत्र्यांचा निकाल लावला आता पक्षाचाही लावतील, विखे पाटलांची संजय राऊतांवर जहरी टिका

| Updated on: Jul 28, 2022 | 3:40 PM

शिवसेनेमध्ये केवळ आदेश चालत असला तरी संजय राऊत याला अपवाद आहेत. त्यांचे हायकमांड हे सिल्वर ओक आहे. त्यामुळे हे सर्व कुणामुळे होते हे सांगण्याची आवश्यकता नसल्याचे म्हणत विखे-पाटील यांनी राऊतांवर सडकून टिका केली. त्याच्याच अशा वक्तव्यांमुळे आमदार दुरावले आणि शिंदे गटात सहभागी झाले. त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा निकाल लावला पण आता पक्षाचा निकाल लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत असेही पाटील म्हणाले आहेत.

Shirdi : मुख्यमंत्र्यांचा निकाल लावला आता पक्षाचाही लावतील, विखे पाटलांची संजय राऊतांवर जहरी टिका
भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील
Follow us on

शिर्डी : सातत्याने शिंदे गट आणि भाजपावर आरोप-प्रत्योरोप करणारे (Sanjay Raut) खा. संजय राऊत हे टिकेचे धनी होत आहेत. असे असले तरी ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. गेल्या काही दिवसांपासून बंडखोर आमदारांवर आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर त्यांनी वेगवेगळे आरोप केले आहेत. मात्र, त्यांच्या अशा विधानानं पक्ष प्रमुखांवर ही वेळ आली तर आता ते पक्षाचाही निकाल लावायला बसले असल्याची जहरी टिका भाजपाचे नेते (Radhakrishna Vikhe-Patil) राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले आहे. (Cabinet Expansion) मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत यांना काही देणेघेणे नाही. केवळ सत्ता गेल्याच्या वौफल्यातून विरोधकांकडून टिका होत असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. तर राज्यातील जनतेला अपेक्षित सरकार हे सत्तेवर आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने विकास आता होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

राऊतांचे हायकमांड हे ‘सिल्वर ओक’

शिवसेनेमध्ये केवळ आदेश चालत असला तरी संजय राऊत याला अपवाद आहेत. त्यांचे हायकमांड हे सिल्वर ओक आहे. त्यामुळे हे सर्व कुणामुळे होते हे सांगण्याची आवश्यकता नसल्याचे म्हणत विखे-पाटील यांनी राऊतांवर सडकून टिका केली. त्याच्याच अशा वक्तव्यांमुळे आमदार दुरावले आणि शिंदे गटात सहभागी झाले. त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा निकाल लावला पण आता पक्षाचा निकाल लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत असेही पाटील म्हणाले आहेत. शिवसेनेला स्वतंत्र विचारसरणी होती. मात्र, यांचे हायकमांड बदलल्याने त्यांचा सूरही बदलला असल्याचे आरोप त्यांनी केला आहे.

सत्ता गमावल्याचं वैफल्य..!

मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असल्याने विरोधरकांकडून सरकारवर टिका होत असली तरी ही टिका विकास कामांसाठी नाहीतर हे सत्ता गेल्यानं आलेलं वैफल्य असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विरोधकांनी चिंता करण्याचे काम नाही. कारण सध्या जनतेला अपेक्षित निर्णय आणि विकास कामे ही मार्गी लागत आहेत. कामांना कुठेही अडसर निर्माण होत नाही. शिवाय राऊतांची विधाने म्हणजे केवळ करमणूक असून त्याचा आनंद सबंध राज्यातील जनता घेत असल्याचेही पाटील म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना

एकनाथ शिंदे यांच्या गटात दिवसेंदिवस सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. खरे शिवसैनिक हे त्यांच्याबरोबरच असून तत्वाशी तडजोड नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. शिवाय राऊतांचे हायकमांड हे सिल्वर ओक असल्याने ते हिंदुत्वापासून दूरावत आहेत. विचारांशी तडजोड करीत आहेत. त्यामुळे राज्यातील शिवसैनिक हा शिंदे बरोबर असून त्याची संख्या वाढत असल्याचे विखे-पाटील म्हणाले आहेत.