BJP vs Congress: काँग्रेस नेते अधीर रंजन राष्ट्रपती मुर्मुंना म्हणाले राष्ट्रपत्नी, सोनियांनी माफी मागावी, स्मृती इराणींची मागणी, अधीर रंजन म्हणतात फासावर चढवणार का?

अधीर रंजन यांनी संसदेच्या बाहेर या वक्तव्याप्रकरणी स्पष्टीकरण दिले. त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. अधीर रंजन म्हणाले- चुकीने मी मूर्मू यांना राष्ट्रपत्नी म्हणालो. आता यावर तुम्ही मला फासावर चढवू इच्छित असाल तर चढवा. सत्ताधारी राईचा पर्वत करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. अधीर रंजन यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्या भेटीची वेळही मागितली आहे.

BJP vs Congress: काँग्रेस नेते अधीर रंजन राष्ट्रपती मुर्मुंना म्हणाले राष्ट्रपत्नी, सोनियांनी माफी मागावी, स्मृती इराणींची मागणी, अधीर रंजन म्हणतात फासावर चढवणार का?
भाजपा खासदार आक्रमकImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 3:38 PM

नवी दिल्ली – काँग्रेसचे खासदार अधीररंजन (Congress MP Adhir Ranjan)यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (President Murmu)यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला. या त्यांच्या वक्तव्याचे प़डसाद गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. भाजपाच्या महिला खासदारांनी (BJP MP)या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात गोँधळ घातला. सोनिया माफी मागा, असे पोस्टर हातात घेऊन त्यांनी घोषणाबाजी केली. स्मृती इराणी म्हणाल्या की सोनिया गांधी यांना माफी मागावीच लागेल. लोकसभा आणि राज्यसभेत झालेल्या गोँधळानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. संसदेची कारवाई स्थगित झाल्यानंतर स्मृती इराणी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात शाबिद्क चकमकही झाली. खासदार रमा देवी अधीररंजन यांच्या वक्तव्यावर जेव्हा सोनिया यांच्याशी बोलण्यास गेल्या, त्यावेळी सोनिया म्हणाल्या की, अधीर रंजन यांनी माफी मागितलेली आहे. तसेच या प्रकरणात माझे नाव का घेण्यात आले, असा सवालही सोनियांनी विचारला. त्यावर तिथे उपस्थित असलेल्या स्मृती इराणी यांनी, मॅडम मी आपली मदत करु शकते, असे वक्तव्य केले. यावर सोनियांनी डोन्ट टॉक टू मी असे म्हणत स्मृती इराणींना फटकारले. हा प्रकार झाल्यावर, सोनियांनी भाजपाच्या महिला खासदारांना धमकावल्याचा आरोप, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला आहे.

अधीर रंजन यांचे स्पष्टीकरण

या सगळ्या गोंधळातच अधीर रंजन यांनी संसदेच्या बाहेर या वक्तव्याप्रकरणी स्पष्टीकरण दिले. त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. अधीर रंजन म्हणाले- चुकीने मी मूर्मू यांना राष्ट्रपत्नी म्हणालो. आता यावर तुम्ही मला फासावर चढवू इच्छित असाल तर चढवा. सत्ताधारी राईचा पर्वत करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. अधीर रंजन यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्या भेटीची वेळही मागितली आहे. ते म्हणालेत की मी राष्ट्रपतींची माफी मागेन, ढोंग्यांची नाही.

हे सुद्धा वाचा

सभागृहातही झाला गोंधळ

स्मृती इराणी सभागृहात म्हणाल्या की- काँग्रेस गरीब आणि आदिवासींच्या विरोधात आहे. आपल्या चुकीवर माफी मागण्याऐवजी काँग्रेस आक्रमक पवित्रा घेते आहे. सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या वतीने माफी मागण्याची गरज आहे. काँग्रेसने प्रत्येक भारतीयाचा अपमान केला आहे. यावर माध्यमांशी बोलताना सोनिया यांनी अधीर रंजन यांनी यापूर्वीच आपली चूक कबूल केली असल्याचे सांगितले आहे.

राष्ट्रपत्नी सगळ्यांसाठी आहेत- अधीर रंजन

राष्ट्रपती भवनात जात असताना जाऊ दिले नाही, याबाबत माध्यमांनी बुधवारी अधीर रंजन यांना विचारणा केली होती. त्यावर आजही जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुस्तानची राष्ट्रपती सगळ्यांसाठी आहे, आमच्यासाठी का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

पहिल्यांदा संसदेची कारवाई भाजपामुळे थांबली

सध्याच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक महागाई आणि जीएसटीच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत. १८ जुलैला सुरु झालेल्या अधिवेशनात पहिल्या दिवशी राज्यसभेत गोँधळ झाला. त्यानंतर दोन्ही सदनांचे कामकाज १९ तारखेपर्यंत स्थगित करण्यात आले. २० जुलैलाही काम रोखण्यात आले. या आठवड्यात संसदेत गोँधळ केल्यप्रकरणी लोकसभेतील चार तर राज्यसभेतील २० खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.