AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संघर्ष, स्वीकार आणि यश: निशांत खाडे यांचा धैर्य, चिकाटी आणि आशावादाचा 25 वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

Nishant Khade : निशांत खाडे यांचा जीवनप्रवास हा अशाच एका अपघातानंतरहीन थांबता, अधिक ठामपणे उभे राहिलेल्या जिद्दीची प्रेरणादायी कहाणी आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

संघर्ष, स्वीकार आणि यश: निशांत खाडे यांचा धैर्य, चिकाटी आणि आशावादाचा 25 वर्षांचा प्रेरणादायी प्रवास
Nishant KhadeImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 04, 2026 | 9:17 PM
Share

मुंबई (महाराष्ट्र),29 जानेवारी : आयुष्यात काही क्षण असे येतात जे माणसाची दिशा बदलतात. काहींसाठी ते क्षण शेवट ठरतात, तर काहींसाठी ते नव्या आशेचा किरणठरतात. निशांत खाडे यांचा जीवनप्रवास हा अशाच एका अपघातानंतरहीन थांबता, अधिक ठामपणे उभे राहिलेल्या जिद्दीची प्रेरणादायी कहाणी आहे.

मणक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर आलेल्या कायमस्वरूपीअपंगत्वामुळे (Spinal Cord Injury)आयुष्याला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने “Will on Wheelz” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन 25 जानेवारी 2026 रोजी Courtyard by Marriott, नेरुळ येथे करण्यात आले. हा कार्यक्रम केवळ एक सोहळा नव्हता, तर संघर्षातून ध्येयाकडे आणि ध्येयाकडून यशाकडे नेणाऱ्या प्रवासाचा उत्सव होता.

कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदर स्वागतपर भाषणाने झाली.त्यानंतर अपघातापूर्वी आणि अपघातानंतरच्या निशांत खाडे यांच्या 25 वर्षांच्या खडतर जीवनप्रवासावर आधारित भावस्पर्शी चित्रफीत सादर करण्यात आली. या चित्रफितीत वेदना, जिद्द, ध्येय, चिकाटी, विनोदबुद्धी, अपयश, आत्मसंघर्ष आणि विजयाचे अनेक क्षण उलगडले गेले, ज्यांनी उपस्थितांच्या मनाला खोलवर स्पर्श केला.

यानंतर निशांत खाडे यांनी उपस्थितांशी संवाद साधत परिस्थितीशी कसे जुळवून घ्यावे, योग्य निवडी कशा कराव्यात आणि दुखापतीनंतर आयुष्याचा मार्ग नव्या उद्देशाने कसा शोधावा यावर आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “व्हीलचेअरमुळे माझ्या दैनंदिन हालचालींचा मार्ग बदलला, पण माझीस्वप्ने, माझी उद्दिष्टे, समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणिअर्थपूर्ण आयुष्य जगण्याचे बळ कधीच कमी झाले नाही. ‘Will on Wheelz’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या आयुष्यात साथदिलेल्या सर्व लोकांचे आभार व्यक्त करण्याची आणि घडलेल्या घटनेचीआठवण करून देण्याची संधी मला मिळाली. माझे प्रयत्न आणि संघर्षहेच सांगतात की दुखापतीनंतर आयुष्य थांबत नाही—ते बदलते, घडते आणि अधिक अर्थपूर्ण बनते.”

यानंतर झालेल्या पॅनल चर्चेत डॉ. केतना मेहता, शिवजीत सिंग राघव, श्री. अरविंद रमेश प्रभू, डॉ. प्रविण आर अमीन आणि निशांत खाडे यांनीसहभाग घेतला. वैद्यकीय तज्ज्ञांचे अनुभव, पुनर्वसनाची प्रक्रिया, मार्गदर्शनआणि प्रत्यक्ष आयुष्यातील संघर्ष यांचा संगम साधत पुनर्प्राप्ती, जगण्याची जिद्द आणि समावेशनावर सखोल व संवेदनशील चर्चा झाली.

कार्यक्रमात निशांत खाडे यांच्या Access4All Foundation याउपक्रमाचाही विशेष उल्लेख करण्यात आला. दिव्यांग व्यक्तींसाठीसुलभता, समावेशन आणि स्वावलंबन वाढवणे, त्यांचा हरवलेलाआत्मविश्वास पुन्हा जागवण्यासाठी जनजागृती, धोरणात्मक हस्तक्षेपआणि सामाजिक संवादाच्या माध्यमातून ही संस्था सातत्याने कार्यरत आहे.

तसेच निशांत खाडे यांच्या ‘Beyond the Barriers’ या व्हीलचेअरवरूनसंपूर्ण भारतभर केलेल्या प्रवासाचा उल्लेख करण्यात आला. याप्रवासाच्या माध्यमातून दिव्यांगतेबाबतचे गैरसमज, सुलभतेची गरज आणिआत्मनिर्भरतेचा संदेश देशपातळीवर प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.

या दीर्घ प्रवासात Nina Foundation यांनी दिलेला वैद्यकीय, मानसिकआणि भावनिक आधार निशांत खाडे यांच्या आयुष्यात निर्णायक ठरला. विशेषतः श्री. अरविंद प्रभू यांनी दिलेला निस्वार्थ आधार, प्रेम आणिजिव्हाळा हा या प्रवासाचा खंबीर आधारस्तंभ ठरला. अडचणीच्या काळात दिलेला हात केवळ आधार ठरत नाही, तर आयुष्याला पुन्हा उभे राहण्याचीप्रेरणा देतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी निशांत खाडे यांच्या प्रवासात मोलाचीभूमिका बजावलेल्या डॉक्टर, थेरपिस्ट, मार्गदर्शक आणि हितचिंतकांचासन्मान करण्यात आला.

हा संपूर्ण प्रवास एक ठाम आणि आश्वासक संदेश देऊन जातो. अपघात शरीराला मर्यादा घालू शकतो, पण स्वप्नांना नाही. दुखापत हालचाली थांबवू शकते, पण विचारांना नाही. आणि परिस्थिती आयुष्य बदलू शकते, पण इच्छा शक्तीला कधीच हरवू शकत नाही. वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ मार्गदर्शन, सातत्यपूर्ण पुनर्वसन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विश्वास देणारी माणसे सोबत असतील, तर दुखापती पलीकडचे आयुष्य केवळ संघर्षमय राहत नाही, तत ते अधिकसन्मानपूर्ण, उद्देशपूर्ण आणि समाजाला दिशा देणारे ठरते.

निशांत खाडे यांचा 25 वर्षांचा प्रवास ही केवळ वैयक्तिक यशाची कथानसून, प्रत्येक अडचणीत सापडलेल्या आणि परिस्थितीशी झगडणाऱ्याव्यक्तीसाठी आशेचा किरण आहे. हार मानू नका. थांबू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. कारण आयुष्य थांबत नाही. ते तुमच्या जिद्दीप्रमाणे योग्य दिशेने घडत जातं.

Follow Us
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?