AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंच्या पुढाकाराने मराठी तरुणीचा शोरमा स्टॉल सुरू, कुक मात्र हिंदी भाषिक… आता नव्या वादाला फुटले तोंड!

डोंबिवलीमधील एकता सावंत या मराठी तरुणीचा शोरमाचा व्यवसाय पालिकेने बंद पाडला होता. आता मनसेच्या पुढाकाराने तो पुन्हा सुरू झाला आहे. मात्र यानंतर नवीन वादाला तोंड फुटले आहे.

राज ठाकरेंच्या पुढाकाराने मराठी तरुणीचा शोरमा स्टॉल सुरू, कुक मात्र हिंदी भाषिक... आता नव्या वादाला फुटले तोंड!
Ekata SawantImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 04, 2026 | 9:43 PM
Share

डोंबिवलीमधील एकता सावंत या मराठी तरुणीचा शोरमाचा व्यवसाय पालिकेने बंद पाडला होता. ज्या ठिकाणी तरुणी व्यवसाय करत होती तिथे आजूबाजूच्या परिसरात परप्रांतीय देखील व्यवसाय करतात, मात्र पालिकेने फक्त ह्या तरुणीचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले होते. परप्रांतीय येऊन जर इकडे येऊन व्यवसाय करतात तर आम्हाला का रोखलं जात? असा सवाल करत एकता सावंत हिने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ थेट मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचला आणि लगेचच मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगून घडलेल्या घटनेची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता या तरुणीचा स्टॉल पुन्हा सुरू झाला आहे. मात्र या स्टॉलवरील कुक हा हिंदी भाषिक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

एकता सावंतच्या स्टॉलवर हिंदी भाषिक कामगार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्तक्षेपानंतर एकता सावंत या मराठी तरुणीचा शोरमा व्यवसाय सुरू झाला. मात्र उद्घाटनानंतर मराठी तरुणीची भूमिका चर्चेचा विषय बनली आहे. या स्टॉलवर आता एक हिंदी भाषिक तरूण काम करणार आहे. मनसेच्या पाठिंब्यानंतर व्यवसाय सुरू झाला आहे, मात्र हिंदी भाषिक कामगारावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर बोलताना एकताने म्हटले की, ‘मराठी कूक उपलब्ध आहेत का? मराठी लोक व्यवसाय शिकतात का? जर शिकत असतील तर मला लगेच दोन मराठी कूक हवेत. मराठी कूक मिळत नसतील तर काय करायचं? असं एकताने म्हटलं आहे.

मराठी कामगार मिळत नाहीत

निलेश गायकवाड या एकतासोबत काम करणाऱ्या तरुणाने सांगितले की, ‘मी दोन वर्षापासून ताईच्या सोबत आहे या ठिकाणी कामाला आहे. आधी दोन जण काम करायचो आता तिसरा व्यक्ती या ठिकाणी कामाला ठेवला आहे. त्याचे नाव शोएब आहे, त्याचा आज पहिला दिवस आहे. व्यवसाय सुरू झाला त्यामुळे आनंद वाटतोय. अविनाश जाधव यांनी सांगितले की टपरीवर वर लाव आणि पार्सल द्या त्यामुळे तिसऱ्या व्यक्ती कामाला ठेवला आहे. आम्ही मराठी कामगार खूप शोधले मात्र आम्हाला मराठी कूक भेटला नाही म्हणून आम्ही शोएबला कामाला ठेवलं आहे.’

मला मराठी कामगार पाहिजेत – एकता सावंत

एकता सावंत यांनी म्हटले की, मराठी कूक का ठेवला नाही असे विचारत असाल तर माझा प्रश्न आहे मराठी कूक आहे का मराठी लोक व्यवसाय शिकतात का? मराठी लोक व्यवसाय शिकत असेल तर मला लगेच दोन खूप पाहिजेत, मराठी लोक मला चालतील. हे हिंदी लोक थोडीशी ट्रेनिंग घेतात आणि येतात. 900 रुपये हजेरी घेतात. इतके पैसे द्यायला परवडत नाही. मला जमलं तर मी स्वतः शोरमा तयार करायला मराठी लोकांना शिकवेल. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मराठी लोकांसाठी मी करणार आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा