आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची CJP आंदोलनाशी संबंधित पदाधिकारी रत्ना सिंग आणि सौरव दास यांनी भेट घेतली. या भेटीत आंदोलनातील विविध मुद्दे आणि तरुणांचा सहभाग यावर सविस्तर चर्चा झाली. भेटीचा फोटो आणि माहिती आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली.

आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये रत्ना सिंग आणि सौरव दास यांच्यासोबत छान दुपार घालवल्याचे सांगितले. तसेच CJP आंदोलनातील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रेरणादायी आवाजांना पाठिंबा देण्यासाठी भारतातील तरुण पिढी मोठ्या संख्येने पुढे आल्याचेही त्यांनी सांगितले.
या भेटीत देशातील सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती, तसेच तरुणांचे अधिकार यावर विचारमंथन झाले. शेअर केलेल्या छायाचित्रात तिघेही प्रसन्न वातावरणात दिसत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या पोस्टनंतर या भेटीची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तरुण कार्यकर्ते आणि सामाजिक आंदोलकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
Published on: Aug 09, 2026 10:39 AM
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक