NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला…
देशाच्या राजकारणात मतदारसंघ पुनर्रचनेचा म्हणजेच डिलिमिटेशनचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. केंद्र सरकारकडून डिलिमिटेशन विधेयक पुन्हा संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशाच्या राजकारणात मतदारसंघ पुनर्रचनेचा म्हणजेच डिलिमिटेशनचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. केंद्र सरकारकडून डिलिमिटेशन विधेयक पुन्हा संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांत केंद्रातील मोदी सरकारला आणखी खासदारांचा पाठिंबा मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सरकारची राजकीय ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे समोर आले आहे.
या खासदारांची डिलिमिटेशन विधेयकाबाबत भूमिका काय असेल, याची उत्सुकता आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आगामी काळात कोणता पक्ष कोणाच्या बाजूने राहतो, तसेच कोण गैरहजर राहतो, हे स्पष्ट होईल असे म्हटले.
रोहित पवार म्हणाले, ‘17 तारखेंपर्यंत सर्वांना बघावे लागेल. पुलाखालून बरंच पाणी जाणार आहे. डिलिमिटेशनबाबत काय होतंय, याची मी देखील वाटत पाहत आहे. अनेक लोक वाट पाहत. आहे. मी आजारी पडल्याने उघडपणे भूमिका घेता आली नाही. जेव्हा डिलिमिटेशनचं विधेयक संसदेत येईल. त्यावेळी कुठला पक्ष कोणाच्या बाजूने जाईल. कोण गैरहजर राहील, हे सर्व बघावे लागेल, असे ते म्हणाले.
Published on: Aug 09, 2026 12:31 PM
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...

