AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिसरं लग्न केलेल्या आमिरला प्रिती झिंटाने केलं दुर्लक्ष? व्हिडीओ पाहून थेट म्हणाली..

अभिनेत्री प्रिती झिंटाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती अभिनेता आमिर खानकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. याच व्हिडीओवर आता प्रितीने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

तिसरं लग्न केलेल्या आमिरला प्रिती झिंटाने केलं दुर्लक्ष? व्हिडीओ पाहून थेट म्हणाली..
प्रिती झिंटा, आमिर खानImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 09, 2026 | 3:14 PM
Share

अभिनेत्री प्रिती झिंटा जवळपास आठ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतेय. ‘बंटवारा 1947’ या चित्रपटात ती अभिनेता सनी देओलसोबत मुख्य भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटाचा निर्माता आमिर खान आहे. गेल्या काही दिवसांपासून सनी देओल आणि प्रिती झिंटा या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून पापाराझींनी दावा केला आहे की प्रितीने या कार्यक्रमात आमिर खानला दुर्लक्ष केलं. हाच व्हिडीओ अखेर प्रितीपर्यंतही पोहोचला आणि त्यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे.

एका पापाराझी पेजवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये प्रिती झिंटा तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर येताना दिसत आहे. व्हॅनबाहेर फोटोग्राफर्सची गर्दी पाहून ती जरा गोंधळते आणि संभ्रमात पडते. “एक मिनिट गाइज, कुठे जायचं आहे”, असा प्रश्न ती विचारते. त्यानंतर फोटोग्राफर्स तिला रस्ता दाखवतात, पण प्रिती मात्र दुसऱ्याच दिशेने चालत जाते. यावेळी आमिरसुद्धा त्याच्या व्हॅनिली व्हॅनबाहेर उभा असतो. परंतु प्रिती त्याच्याकडे बघतही नाही, ती थेट पुढे निघून जाते. ‘ओह नो.. प्रिती झिंटाने आमिर खानला दुर्लक्ष केलं का’, असं कॅप्शन देत पापाराझींनी हा व्हिडीओ पोस्ट केला. याच व्हिडीओवर आता तिने प्रतिक्रिया दिली आहे.

प्रिती झिंटाचं उत्तर-

प्रितीने या व्हिडीओच्या कमेंटमध्ये लिहिलं, ‘अशा पद्धतीचं क्लिकबेट कंटेंट ठीक नाही. मी आमिरला पाहिलंसुद्धा नव्हतं, कारण मी खूप घाईत होते. मला आज जाऊन काही शॉट्स शूट करायचे होते आणि ‘बंटवारा 1947’च्या प्रमोशनसाठी मला लांब विमानाने प्रवास करायचं होतं. पुढच्या वेळी जर तुमचा हेतू कोणत्याही प्रकारची नकारात्मकता पसरवायची असेल, तर कृपया मला थांबवून माझे फोटो क्लिक करण्याची अपेक्षा ठेवू नका. माझ्या मनात आमिरविषयी प्रचंड प्रेम आणि आदर आहे. त्यामुळे मला अशा गोष्टी अजिबात आवडत नाहीत.’

प्रिती झिंटाच्या आगामी ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलं आहे. यात सनी देओल, शबाना आझमी, अली फजल, करण देओल, अभिमन्यू सिंग, कनिका कपूर आणि खुशी हजारे यांच्याही भूमिका आहेत. येत्या 14 ऑगस्ट रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा