AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक

समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक

| Updated on: Aug 09, 2026 | 10:59 AM
Share

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग वादात सापडला आहे. या रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्गात बदल केल्याने अहिल्यानगरकरांनी विरोध दर्शवला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलनाला नारा पुकारण्यात आला आहे. नाशिक-पुणे रेल्वेसाठी समृद्धी महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आलं.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग वादात सापडला आहे. या रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्गात बदल केल्याने अहिल्यानगरकरांनी विरोध दर्शवला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलनाला नारा पुकारण्यात आला आहे. नाशिक-पुणे रेल्वेसाठी समृद्धी महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पूर्वीच्याच मूळ आरेखानुसार करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निर्णयाच्या विरोधात सिन्नर, संगमनेर, अकोले, नाशिकमध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केलं. या आंदोलनात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सत्यजित तांबे सहभागी झाले. यावेळी समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरु असताना सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट झाल्याचंही सांगितलं जात आहे.

चाकण ते सिन्नर मार्गाचा विकास मूळ सरळ मार्गानेच व्हावा, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. सिन्नर, संगमनेर आणि जुन्नर या मार्गावरून वाहतूक सुरळीत राहावी आणि या मार्गाला प्राधान्य मिळावे, यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाला विविध पक्षांतील कार्यकर्ते तसेच पक्षनिरपेक्ष नागरिकांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

ताज्या माहितीनुसार पोलिसांनी आंदोलकांना थांबण्याचे प्रत्न केले आहेत आणि समृद्ध महामार्गावर जाण्यापासून रोखलं आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाची नजर आहे. आंदोलकांच्या भूमिकेमुळे पुढील काही तासांत या भागातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Published on: Aug 09, 2026 10:59 AM

Follow Us