AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill: दुखापतग्रस्त शुभमन गिलने अखेर ‘तो’ निर्णय घेतलाच, श्रीलंकेविरुद्ध मॅचपूर्वीच ठरवलं की आता तो…

15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. सराव सत्रादरम्यान उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झालेला भारतीय कर्णधार शुभमन गिल तीन दिवसांनंतर पुन्हा फलंदाजी करताना दिसला आहे.

Shubman Gill: दुखापतग्रस्त शुभमन गिलने अखेर 'तो' निर्णय घेतलाच, श्रीलंकेविरुद्ध मॅचपूर्वीच ठरवलं की आता तो...
| Updated on: Aug 09, 2026 | 2:55 PM
Share

15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. सराव सत्रादरम्यान उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झालेला भारतीय कर्णधार शुभमन गिल तीन दिवसांनंतर पुन्हा फलंदाजी करताना दिसला आहे. कोलंबो येथील नॉनडेस्क्रिप्ट्स क्रिकेट मैदानावर श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन दिवसीय सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शुभमन गिलने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली. सराव सामना सुरू होण्याच्या केवळ एक दिवस आधी भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या बोटाला दुखापत झाली होती. आता यामुळे कर्णधार शुभमन गिलने एक मोठं पाऊल उचलले आहे.

बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने खबरदारीचा उपाय म्हणून त्याला सराव सामन्यातून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. गिलच्या अनुपस्थितीत, अनुभवी फलंदाज केएल राहुलने सामन्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. भारतीय संघाच्या पहिल्या डावात गिल मैदानात उतरलाही नव्हता. मात्र, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गिल नेटमध्ये फलंदाजी करताना दिसला. टीम इंडिया सराव सामना खेळत असताना, गिल पॅड्स घालून नेटमध्ये थ्रोडाउन्स घेताना आणि वेगवान गोलंदाजांचा सामना करताना दिसला. या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ दुखापतींनी त्रस्त आहे. वे

गवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर हे दुखापतीमुळे मालिकेतून आधीच बाहेर झाले आहेत. साई सुदर्शनही पूर्ण तंदुरुस्तीअभावी संघाबाहेर आहे. अशा परिस्थितीत, कर्णधार शुभमन गिलचे नेटमध्ये परतणे आणि पहिल्या कसोटीच्या सुरुवातीपूर्वी आपला लय पुन्हा मिळवणे हे टीम इंडियासाठी एक चांगले चिन्ह आहे. श्रीलंका क्रिकेट इलेव्हनच्या पहिल्या डावातील 363 धावांच्या प्रत्युत्तरात, भारताने आपला पहिला डाव 357 धावांवर घोषित केला. गोलंदाजांना संधी देण्यासाठी टीम इंडियाने खेळाच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजी न करण्याचा निर्णय घेतला. गिलच्या अनुपस्थितीत, युवा डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलने पहिल्या डावात 142 धावांचे शतक झळकावत शानदार कामगिरी केली. केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि मानव सुथारही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते. आता साई सुदर्शनची रिप्लेमेंट म्हणून संघात कोणाला एन्ट्री मिळेल याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

Follow Us
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...