Kartik Aaryan Lalbaugcha Raja : काल राष्ट्रीय पुरस्कार जिंकला, आज कार्तिक आर्यनने लालबाग राजाच्या दरबारात येऊन केलं पहिलं हे काम
Kartik Aaryan Lalbaugcha Raja : गुजरातमध्ये काल 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूडचा दमदार अभिनेता कार्तिक आर्यनला 'चंदू चॅम्पियन' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

गुजरातमध्ये काल 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूडचा दमदार अभिनेता कार्तिक आर्यनला ‘चंदू चॅम्पियन’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. काल त्याने हा पुरस्कार स्वीकारला. त्यानंतर आज तो ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनाला पोहोचला. त्याने बाप्पांच्या चरणी डोकं टेकवून आशीर्वाद घेतला. कार्तिक आर्यन बाप्पाच्या दर्शनाला येताना नॅशनल पुरस्कारही सोबत घेऊन आला होता. त्याने बाप्पाच्या चरणी पुरस्कार समर्पित केला. हात जोडून प्रार्थना करताना बाप्पाच्या चरणी डोकं टेकवलं. कार्तिक पूर्णपणे बाप्पाच्या भक्तीत लीन झालेला दिसला. सोशल मीडियावर कार्तिक आर्यनचे ‘लालबागचा राजा’चे आशीर्वाद घेतानाचे फोट, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन आपला राष्ट्रीय पुरस्कार लालबागच्या राजाच्या मुर्तीजवळ घेऊन जाताना दिसतोय. आशीर्वाद घेण्याआधी त्याने आपला नॅशनल पुरस्कार बाप्पाच्या चरणामध्ये ठेवला. अभिनेत्याचे हात जोडल्याचे फोटो दिसत आहेत. कार्तिक त्याच्या ट्रेडिशनल लूकमध्ये दिसला. कुर्ता, पायजमामध्ये त्याचं व्यक्तीमत्व अजून खुलून आलेलं.
View this post on Instagram
भक्तीने फॅन्सचं मन जिंकलं
राष्ट्रीय पुरस्कार हे कार्तिक आर्यनसाठी मोठं यश आहे. त्याच्यासाठी हे एक स्वप्न सत्यात उतरण्यासारखं आहे. अभिनेत्याने पुरस्कार जिंकल्यानंतर सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्टही केली. त्यात एका छोट्याशहरापासून राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यापर्यंतची झलक दाखवली. त्याला तो बालपणीचा कार्तिक आठवला, ज्याने कधी अभिनेता बनण्याचं स्वप्न पाहिलेलं. कार्तिकचा साधेपणा आणि भक्तीने फॅन्सचं मन जिंकलं. कार्तिकवर राष्ट्रीय पुरस्कारसाठी फॅन्सकडून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.
