AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda : गोविंदा परत आले तर माफ कराल? ‘वन नाईट स्टँड’वर बोलणाऱ्या सुनिता आहुजानी मनातलं सांगितलं; म्हणाल्या खूप कमी लोक…

अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा सध्या तिच्या नव्या पॉडकास्टमुळे चर्चेत आहे. त्यात तिने गोविंदावरील आपले निस्सीम प्रेम, लग्नाचा कोणताही पश्चाताप नसल्याचं सांगितलं. 'तो काहीही नसताना मी त्याच्यावर प्रेम केलं' असे तिने नमूद केले. सुनीताने तिच्या भावनिक आणि कणखर स्वभावाबद्दलही मोकळेपणाने व्यक्त होत, 'माझ्यासाठी आत्मसन्मान खूप महत्त्वाचा असून, मी सहज माफ करत नाही,' असं स्पष्ट केलं.

Govinda : गोविंदा परत आले तर माफ कराल? 'वन नाईट स्टँड'वर बोलणाऱ्या सुनिता आहुजानी मनातलं सांगितलं; म्हणाल्या खूप कमी लोक...
| Updated on: Sep 23, 2026 | 4:53 PM
Share

अभिनेता गोविंदाची (Govinda) पर्सनल लाइफ सध्या बरीच चर्चेत आहे. याचदरम्यान त्याची पत्नी सुनीता अहुजाचा (Sunita Ahuja) नवा पॉडकास्ट आला आहे. त्यात ती विविध विषयांवर बोलली. गोविंदाशी लग्न करण्याचा कोणताही पश्चाताप होत नसल्याचं तिने नमूद केलं. तो परत आला तर माफ करणार का असा सवाल विचारण्यात आल्यावर सुनीताने एकदम स्पष्ट उत्तरही दिलं. ‘ माझ्यासाठी आत्मसन्मान खूप महत्त्वाचा असून, मी सहज माफ करत नाही,’ असं स्पष्ट केलं.

या मुलाखतीत बोलताना सुनीता म्हणाली, ‘ मी त्याच्यावर खूप प्रेम केलं. आमच्या लग्नाला माझे वडील आले नाहीत, पण मी म्हटलं हरकत नाही. तुम्हाला यायचं नसेल तर येऊ नका. माझं गोविंदावर इतकं प्रेम होतं की मी त्याच्याशीच लग्न करणार हे माझं पक्क ठरलं होतं’, असं सुनीतने नमूद केलं. ‘मला या निर्णयचा कधीच पश्चाताप झाला नाही असंही ती म्हणाली. मी जेव्हा गोविंदाला भेटले तेव्हा तो खूप चांगला आणि प्रामाणिक माणूस होता. मला त्याच्याशी लग्न केल्याचा काहीही पश्चाताप वाटत नाही’, असंही तिने सांगितलं.

‘ लोकांना वाटतं की मी खूपच कठोर, कडक आणि बिनधनास्त आहे. पण मी जे काही बोलते ते मनापासून असतं. खूप कमी लोकं आहेत, जे मला नीट समजून घेतात. मी नारळाप्रमाणे आहे – बाहेरून टणक पण आतून मऊ, नरम.  मी खूप इमोशनल व्यक्ती आहे’, असंही तिने स्वत:बद्दल सांगितलं.

तो त्याचं आयुष्य जगतोय, मी माझं

“माझी इच्छा आहे की लोकांनी आपापलं आयुष्य जगावं आणि इतरांनाही त्यांचं आयुष्य जगू द्यावं. आपण आता अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत, जिथे ते त्यांचं आयुष्य जगत आहेत आणि मीही माझं आयुष्य जगायला सुरुवात केली आहे.” असंही सुनीता म्हणाली.

‘त्याच्याकडे काहीही नसतानाही मी प्रेम केलं’

सुनीता अहुजाने त्यांच्या नात्याच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगताना म्हटलं, ” गोविंदाकडे जेव्हा काहीही नव्हतं, तेव्हाही मी त्याच्यावर प्रेम केलं. मी एका मोठ्या कुटुंबातून आले होते आणि त्याचं तसं नव्हतं, तरीही मी त्याच्यावर प्रेम केलं. माझ्या मनात आजही त्याच्याबद्दल तीच भावना आहे. पण त्याच्या मनातही आज तशीच भावना आहे की नाही, हे मला माहीत नाही; पण माझ्या मनात मात्र ती भावना अजूनही आहे.” असंही तिने नमूद केलं.

मी इतक्या सहजपणे माफ करत नाही

गोविंदा पुन्हा परत यायचं म्हणाले तर त्यांना माफ कराल का? असं या मुलाखतीदरम्यान सुनीताला विचारण्यात आलं. तेव्हा तिने त्यावर स्पष्ट उत्तर दिलं. ” मला यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. मी इतक्या सहजपणे माफ करत नाही. ‘माफी’ हा शब्द माझ्या शब्दकोशातच नाही. तुम्हाला जे हवं ते करा आणि नंतर येऊन माफी मागा” (असं होत नाही) असं ती म्हणाली. ” (आपल्याल) फक्त त्या व्यक्तीचीच उणीव जाणवते, जी मनापासून प्रेम करते. मी स्वाभिमानी महिला आहे आणि माझ्यासाठी माझा स्वाभिमान खूप महत्त्वाचा आहे. मी एक, दोन किंवा तीन वेळा संधी देते; पण त्यानंतर मी म्हणेन, ‘तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे जा.’ पण माझा स्वाभिमान माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.” असंही तिने स्पष्ट शब्दांत सुनावलंय.

जर एखादा पुरूष महिलेच्या प्रेमाचा आदर राखू शकत नसेल, तर माझ्या मते त्या पुरुषाने तिच्या आयुष्यातून बाहेर पडावं. तो त्या महिलेच्या लायकीचा नाही. एखाद्या चांगल्या स्त्रीची किंमत पुरुषाला कळत नसेल, तर त्यामध्ये त्याचंच नुकसान आहे. मी याला माझं दुर्दैव मानत नाही, असही सुनिता अहुजाने नमूद केलं.

Follow Us
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...