Disha Salian Case Update: या प्रकरणात अनेक पुरावे… दिशा सालियनच्या वकिलांचा मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाले?

Disha Salian Case Update: दिशा सालियनचे वकील निलेश ओझा यांनी मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी या प्रकरणाबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Disha Salian Case Update: या प्रकरणात अनेक पुरावे... दिशा सालियनच्या वकिलांचा मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाले?
Disha Salian and nilesh Oza
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 1:53 PM

राज्यात सध्या दिशा सालियन प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यापासून अनेकजण यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. आता दिशा सालियनचे वकील निलेश ओझा यांनी मोठी अपडेट दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले? वाचा…

माध्यमांशी बोलताना वकील निलेश ओझा म्हणाले की, आरोप सिद्ध करायला लागतात तरी काय एखाद्या व्यक्तीने एका महिलेवरती अत्याचार केला आहे. या प्रकरणात अनेक पुरावे आहेत. त्यांचा आरोप नेहमीच राजकीय प्रेरित असा होत आहे. सतीश सालेन दिशाचे वडील न्याय मागत आहेत. त्यांना मिळत नाहीये. तुम्ही कायदेशीर कारवाईबाबत कोर्टात हरले माफी मागावी लागली.

“परमवीर सिंगसह अनेकांना कोठडीत घेतल्याशिवाय…”

पुढे ते म्हणाले की, पॉलिटिकल प्रेरित असे त्यांनी ट्विट केले आहे त्यामुळे त्यांना नोटीस बजावली जाणार आहे. वकिली करून देणार नाही फिरू देणार नाही अशा धमक्या त्यांनी दिल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती हा देश सुरू आहे. तुमच्या धमक्याला कोणीही जुमानणार नाही. मानहानीची नोटीस त्यांना देणार. परमवीर सिंगसह अनेकांना कोठडीत घेतल्याशिवाय सीबीआयला पर्याय नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. स्त्री शक्तीचा सन्मान झाला पाहिजे.

संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया

दिशाचे वडिल सतीश सालियन यांच्या जबानीनंतर सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर आज दिशाचे वडील सतीश सालियन हे आदित्य ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत. सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करताना 500 कोटींच्या भरपाईची मागणी केली आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. संजय राऊत यांनी,त्यांना अब्रू आहे आणि आम्हाला अब्रू नाही का? अब्रू अब्रू म्हणतात त्यांना अब्रू आहे आणि आम्हाला नाही का? तुम्ही ज्या पद्धतीने कोणाच्या तरी हातचं बाहुलं बनून आमच्यावरती चिखल फेक करताय, ठाकरे कुटुंबावर आमच्या प्रतिष्ठेचा, आमच्या अब्रूचा काही सवाल आहे की नाही? मी कालही म्हणालो हा जो प्रकार आहे काही बेवड्यांचा आणि उरबडव्यांचा आहे. यामध्ये काही बेवडे आहेत आणि काही उरबडवे आहेत. ते एकत्र आले. आणि त्यांना कोणी तरी नियंत्रीत करत आहे की तुम्ही हे करा, हे बोला, आज इकडे जा, तिकडे जा, हे सर्व चालू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us