अमित शाहांसोबतच्या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा, एकनाथ शिंदेंनी गुपित फोडलं; सगळे खासदार..

कनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांना अमित शाहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काय घडलं, असं विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना कालच्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाली नाही. त्या बैठकीत कृषी विभाग, नगरविकास विभागाच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली, असे त्यांनी सांगितले

अमित शाहांसोबतच्या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा, एकनाथ शिंदेंनी गुपित फोडलं; सगळे खासदार..
AMIT SHAH AND EKNATH SHINDE
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 15, 2026 | 3:19 PM

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मंंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे यांचीही उपस्थिती होती. विशेष म्हणजे ठाकरे गटातून बंड करून नुकतेच शिंदे गटात सामील झालेले सहा खासदारही या बैठकीला उपस्थित होते. या सर्वांची अमित शाहा यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि शिंदे गटाला मिळणारी संधी यावर या बैठकीत चर्चा झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात होता. दरम्यान, आता यावरच शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्या बैठकीत काय-काय घडलं, हे शिंदे यांनी सांगितले आहे.

अमित शाह यांच्यासोबत कोणकोणत्या विषयांवर चर्चा?

एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांना अमित शाहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काय घडलं, असं विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना कालच्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाली नाही. त्या बैठकीत कृषी विभाग, नगरविकास विभागाच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. मतदारसंघांच्या मुद्द्यांवरी कालच्या बैठकीत आमच्यात चर्चा झाली. अमित शाहा यांच्यासोबत खासदारांच्या मतदारसंघांच्या काही विषयांवर चर्चा करण्यात आली, अशी माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. काही खासदार आमच्या पक्षात आल्यानंतर पहिल्यांदाच ही शाहांसोबत भेट घेतली, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

Loading...

श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद ?

दरम्यान, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, असे सांगितले जातेय. या मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रिपद दिले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिपद दिले जाऊ शकते, असा दावा केला जातोय. शिवसेनेत सध्या केंद्रीय राज्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणआर? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us