दुख:द बातमी! गोव्याच्या माजी मंत्र्यांचे निधन

| Updated on: Oct 03, 2022 | 12:37 PM

गोव्याचे (Goa) माजी परिवहन मंत्री पांडूरंग राऊत यांचं निधन झालं (Pandurang Raut passed away) आहे. त्यांनी वयाच्या 76 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

दुख:द बातमी! गोव्याच्या माजी मंत्र्यांचे निधन
Image Credit source: dainik gomantak
Follow us on

पणजी : गोव्याचे (Goa) माजी परिवहन मंत्री पांडूरंग राऊत यांचं निधन झालं (Pandurang Raut passed away) आहे. त्यांनी वयाच्या 76 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पांडूरंग राऊत यांच्या निधनाबाबत त्यांच्या कुटुंबीयांकडून माहिती देण्यात आली आहे.पांडूरंग राऊत (Pandurang Raut) हे गोवा प्रजा पक्षाचे नेते होते. 1991ते 1994 या काळात पांडूरंग राऊत हे कॅबिनेट मंत्री होते.राऊत हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करत पांडूरंग राऊत यांच्या निधनावर दु :ख व्यक्त केलं आहे.

पांडुरंग राऊत यांचं गोव्याच्या विकासामध्ये मोठं योगदान होतं. त्यांनी सर्मपण भावाने गोव्याची सेवा केली. त्यांचं गोव्याच्या विकासामध्ये असलेलं योगदान आणि सेवेसाठी लोक त्यांना कायम लक्षात ठेवतील. या दु:खद प्रसंगी मी राऊत यांच्या कुटुंबीयांसोबत आहे.अशा शद्बात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपले दु :ख व्यक्त केलं आहे.

हे सुद्धा वाचा

 

पांडुरंग राऊत यांचा परिचय

पांडुरंग राऊत यांचा जन्म 1946 साली झाला. त्यांनी महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाच्या तिकीटावर 1989 साली गोवा विधनसभेची पहिल्यांदा निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये ते विजयी देखील झाले. त्यानंतर 1991 साली त्यांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची जबादारी पडली. त्यांनी कॅबिनेट मंत्री असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.एप्रिल 1994 पर्यंत ते कॅबिनेट मंत्री होते. ते पुन्हा एकदा 1999 साली गोवा विधानसभेवर निवडून आले. ही त्यांची तीसरी टर्म होती. याव्यतिरिक्त 1999 ते 2000 या काळात ते सरकारच्या कमिटीचे सदस्य देखील होते.