Satej Patil : मोठी बातमी! गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट, आकडे फिरले, सतेज पाटलांना जबर धक्का; एका जागेवर…

आपल्या पॅनेलच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर मात्र सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केलाय. मतमोजणीला मुद्दामहून उशीर केला जातोय, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय.

Satej Patil : मोठी बातमी! गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट, आकडे फिरले, सतेज पाटलांना जबर धक्का; एका जागेवर...
satej patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2026 | 6:47 PM

कोल्हापुरातील गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीत ऐन वेळी मोठा ट्विस्ट आला आहे. मतमोजणीत सुरुवातीला सतेज पाटील यांचे पॅनेल आघाडीवर होते. अगोदर त्याचे उमेदवार एकूण 15 जागांवर आघाडीवर होते. परंतु आता समोर आलेल्या निकालानुसार त्यांच्या पॅनेलच्या एकूण 13 जागांवर विजय झाला आहे. दुसरीकडे महायुतीचे समर्थन असलेल्या 12 उमेदवरांचा विजय झालाय. दरम्यान, या निवडणुकीत ऐनवेळी मोठा ट्विस्ट झाला आहे. एका जागेसाठी मतमोजणी पुन्हा करण्यात आली आहे. याच मतमोजणीनंतर सतेज पाटील यांच्या पॅनेलची एक जागा कमी झाली आहे.

नेमका काय ट्विस्ट आला?

महायुतीची एक जागा वाढली आहे. तर सतेज पाटील यांच्या पॅनेलची एक जागा कमी झाली आहे. याच एका जागेसाठी पुन्हा मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर सतेज पाटील यांच्या पॅनेलचे सचिन घोरपडे हे पराभूत झाले आहेत. तर दुसरकीकडे महायुतीचे उमेदवार अमर पाटील यांचा विजय झालाय.

Loading...

सतेज पाटील यांचा गंभीर आरोप

आपल्या पॅनेलच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर मात्र सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केलाय. मतमोजणीला मुद्दामहून उशीर केला जातोय, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. असे असले तरी सत्तेत बसण्यासाठी जो जादुई आकडा लागतो तो सतेज पाटील यांनी गाठला आहे. त्यामुळे तेच आता यापुढे गोकुळचा कारभार हाकणार, अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

कोल्हापूर गोकुळ निकाल

समविचारी आघाडी सतेज पाटील – 13 जागा

महायुती -12

विजयी उमेदवारांची यादी

सर्वसाधारण गट

१. अभिजित प्रभाकर तायशेटे (सतेज पाटील)

२. शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर (सतेज पाटील)

३. राहुल पांडुरंग पाटील (महायुती)
⁠

४ चेतन अरुण नरके (महायुती)

५ अजित शशिकांत नरके (महायुती)

६ किसन बापूसो चौगले (सतेज पाटील)

७ अंबरीषसिंह संजय घाटगे (महायुती)

८ बाबासाहेब श्रीपती चौगले (सतेज पाटील)

९ राहुल बजरंग देसाई (सतेज पाटील)

१० विद्याधर बाबुराव गुरबे (सतेज पाटील)

११ विरेंद्र संजय मंडलिक (महायुती)

१२ मदन बाबुराव देसाई (महायुती)

१३ बाबासाहेब विष्णू देवकर (सतेज पाटील)

१४ राजेश नरसिंगराव पाटील (महायुती)

१५ रणजितसिंह दिलीपराव पाटील (महायुती)

१६ रणजितसिंह कृष्णराव पाटील (महायुती)

१७ अजित पांडुरंग पाटील (महायुती)

१८ कर्णसिह गायकवाड (महायुती )

१९ विश्वजीत दिनकरराव जाधव (सतेज पाटील)

२० अमर पाटील कोडोली (महायुती)

महिला राखीव गट

१. अंजना केदारी रेडेकर (सतेज पाटील)

२. भाग्यश्री धीरज डोंगळे (सतेज पाटील)

इतर मागासवर्गीय गट

१. शशिकांत शामराव खोत (सतेज पाटील)

अनुसूचित जाती गट

१. राजू बाबा आवळे (सतेज पाटील)

भटक्या-विमुक्त जमाती गट

१. बयाजी शेळके (सतेज पाटील)
२. ⁠..

…..

समविचारी आघाडी (सतेज पाटील) – 13
महायुती – 12़

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us