‘माझ्यावर टीका करुन त्यांना मंत्रीपद मिळेल’, नारायण राणेंचा नीलम गोऱ्हेंना टोला

| Updated on: Aug 21, 2021 | 6:55 PM

बाळासाहेबांबद्दल आदर आणि उद्धव ठाकरेंविषयी गरळ, हे तर दुतोंडी साप आहेत, अशा शब्दात शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केलीय. गोऱ्हे यांच्या या टीकेला आता राणेंनीही प्रत्युत्तर दिलंय. नीलम गोऱ्हे यांना मी शिवसेनेत आणलं. माझ्यावर टीका करुन कदाचित त्यांना मंत्रीपद मिळेल, असा टोला राणे यांनी लगावला आहे.

माझ्यावर टीका करुन त्यांना मंत्रीपद मिळेल, नारायण राणेंचा नीलम गोऱ्हेंना टोला
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे
Follow us on

मुंबई : बाळासाहेबांबद्दल आदर आणि उद्धव ठाकरेंविषयी गरळ, हे तर दुतोंडी साप आहेत, अशा शब्दात शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केलीय. गोऱ्हे यांच्या या टीकेला आता राणेंनीही प्रत्युत्तर दिलंय. नीलम गोऱ्हे यांना मी शिवसेनेत आणलं. माझ्यावर टीका करुन कदाचित त्यांना मंत्रीपद मिळेल, असा टोला राणे यांनी लगावला आहे. राणे यांची जन-आशीर्वाद यात्रा आज वसईमध्ये दाखल झाली. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Narayan Rane’s reply to Shiv Sena leader Neelam Gorhe’s criticism)

नीलम गोऱ्हेंची राणेंवर टीका

एका बाजूला बाळासाहेबांप्रति आदर व्यक्त करायचा आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना शिवसेनाप्रमुखांनी राज्याची सेवा करण्यासाठी आशीर्वाद दिले होते, त्या उद्धव ठाकरेंविषयी सातत्याने गरळ ओकायची म्हणजे दुतोंडी सापासारखे ह्यांचे वर्तन आहे, असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी राणेंवर टीकेची तोफ डागली.

राणेंचं समर्थन करणं फडणवीसांची मजबुरी

देवेंद्र फडणवीस यांनी राणेंचे समर्थन केले ही त्यांची मजबुरी आहे. ते नारायण राणे यांच्यामागे फरफटत जात आहेत. ह्या फरफटत जाण्याचा अर्थ काही दिवसांत त्यांच्या लक्षात येईल. आमच्यावर बोलत राहिल्याशिवाय नारायण राणेंना मीडिया प्रसिद्धी देत नाही म्हणून ते रोज बोलतात, असा टोलाही त्यांनी राणेंना लगावला.

..तर एकनाथ शिंदेंना आमच्यात घेऊ – राणे

जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे केवळ सही पुरतेच मंत्री आहेत. ते शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. यावेळी राणेंनी हा मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे मंत्री असले तरी सही पुरते आहेत. मातोश्रीशिवाय ते एकही सही करू शकत नाहीत. ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर घेऊ, असं सांगतानाच आम्ही मनात आणले तर लवकरच सरकारचे विसर्जन करू, असा दावाही त्यांनी केला.

मनसे-भाजप युती झाली तर आनंदच

राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यात जातीवाद अधिक वाढला, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा मी राज ठाकरे यांचा मुद्दा खोडत नाही, असं ते म्हणाले. मनसे आणि भाजपा मैत्री झाली पाहिजे. ही युती झाली तर त्याचा आनंदच असेल, असंही ते म्हणाले.

तरुणांना आवाहन

निर्यात केली तर दरडोई उत्पन्नही वाढेल. आर्थिक समृद्धीकडे देश वाटचाल करेल. अमेरिका आणि चीन प्रमाणे महासत्ता बनू. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम आणि कार्य पाहून अभिमान वाटतो. त्यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री आहे. हे माझं भाग्य आहे. देशातील 80 टक्के उद्योग माझ्याखात्याकडे आहेत. तरुण-तरुणींना उद्योजक बनवण्याचं काम माझ्याकडे आहे. बेकारी कमी करावी, गरीबी कमी करावी यासाठी तरुणांनी लघू आणि सुक्ष्म उद्योग सुरू करावा, असं आवाहन त्यांनी केलं.

इतर बातम्या :

‘मदिरालयावर ज्यांचा विश्वास, त्यांना मंदिरांशी काही देणंघेणं नाही’, सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला टोला

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं महत्वाचं वक्तव्य, काय म्हणाले पवार?

Narayan Rane’s reply to Shiv Sena leader Neelam Gorhe’s criticism