केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा पहिल्याच दिवशी कामाचा धडाका, अधिकाऱ्यांनाही घेतलं फैलावर!

नारायण राणे यांचा कामाची पद्धत महाराष्ट्रात सर्वांना माहिती आहे. पण त्यापासून परिचित नसलेल्या दिल्लीतील अधिकाऱ्यांना आज राणेंच्या कामाच्या पद्धतीचा प्रत्यय आला. राणे यांनी पहिल्याच दिवशी कामाचा धडाका लावल्याचं पाहायला मिळालं.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा पहिल्याच दिवशी कामाचा धडाका, अधिकाऱ्यांनाही घेतलं फैलावर!
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पदभार स्वीकारला
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 10:01 PM

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीय. त्यानंतर आज नारायण राणे यांनी पदभार स्वीकारला. नारायण राणे यांचा कामाची पद्धत महाराष्ट्रात सर्वांना माहिती आहे. पण त्यापासून परिचित नसलेल्या दिल्लीतील अधिकाऱ्यांना आज राणेंच्या कामाच्या पद्धतीचा प्रत्यय आला. राणे यांनी पहिल्याच दिवशी कामाचा धडाका लावल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. राणेंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याची चर्चा आज राजधानी दिल्लीत चांगलीच गाजली. (Union Minister Narayan Rane was angry with the officials in Delhi )

राणे यांनी आज सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर खात्याशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. राणे यांचा पहिलाच दिवस असल्यामुळे अधिकारी वर्ग पूर्ण तयारी करुन आला नव्हता. बैठकीदरम्यान राणेंना ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी आपल्या स्टाफला बाहेर काढलं आणि अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. राणे यांनी अधिकाऱ्यांसोबत जवळपास तासभर बैठक घेतली. त्यातील अर्धा तास तर त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं.

राणेंच्या कार्यशैलीची पहिल्याच दिवशी चर्चा

आपण मंत्रालयात पदभार स्वीकारण्यासाठी येणार असल्याचं माहिती होतं. असं असताना तयारी कशी केली गेली नाही? असा सवाल राणेंनी विचारला. त्याचबरोबर यापुढे प्रत्येक बैठकीला येताना नोट सोबत आणण्याची तंबीही राणेंनी अधिकाऱ्यांना दिली. राणे यांची ही कार्यशैली पाहून दिल्लीतील अधिकारी चांगलेच भांबावल्याचं पाहायला मिळालं. राणेंच्या या बैठकीची चर्चा अन्य विभागातील अधिकारी वर्गही करत असल्याचं आज दिसून आलं.

उद्धव ठाकरेंवर निशाणा

पदभार स्वीकारताना राणेंंनी नोंदबुकमध्ये ‘ओम श्रीगणेशा’ लिहित आपल्या नव्या इनिंगला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी सेनेविरोधातही श्रीगणेशा केला. पदभार स्वीकारलेल्या खुर्चीवरुनच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर पहिला वार केला. ‘मला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पण उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या नाहीत. कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही’, असं म्हणत राणेंनी मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच उद्धव यांच्यावर निशाणा साधला.

संबंधित बातम्या : 

‘शिवसेनाप्रमुखांना राणेंची उंची माहीत होती, म्हणूनच मुख्यमंत्रीपदी बसवलं’, प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना टोला

नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद दिल्यानं शिवसेना-भाजप युतीची शक्यता मावळली? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Union Minister Narayan Rane was angry with the officials in Delhi

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.