Gokul Dudh Election Winner List : गोकुळ निवडणुकीत ऐनवेळी गेम, तरी सतेज पाटलांनी मैदान मारलं, विजयी उमेदवारांची पूर्ण यादी समोर
मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या कलांमध्ये सेतज पाटील यांच्या पॅनेलचे 15 उमेदवार आघाडीवर होते. नंतर हा फरक कमी होत गेला. एका जागेसाठी पुन्हा मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर सतेज पाटलांच्या पॅनेलचे सचिन घोरपडे पराभूत झाले.

Gokul Dudh Election Result : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. गोकुळवर सत्ता मिळवण्यासाठी महायुतीने तसेच सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वातील पॅनेलने पूर्ण ताकद लावली होती. दरम्यान या निवडणुकीचा निकाल आता समोर आलाय. या निवडणुकीत कोल्हापूरकरांनी सतेज पाटील यांच्या पेनेलला यावेळी साथ दिली. एकूण 25 जागांसाठी निवडणूक झाली होती. यातील 13 जागांवर सतेज पाटील यांच्या पॅनेलच्या उमेदवारांचा तर 12 जागांवर महायुतीच्या पॅनेलचा विजय झालाय.
सतेज पाटलांची एक जागा कमी कशी झाली?
या निवडणुकीत महायुतीने राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी आणि विरोधकांनी सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वात राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी नावाने पॅनेल उभे केले होते. समोर आलेल्या निकालानंतर गोकुळवर आता सतेज पाटलांच्याच पॅनेलची सत्ता असणार हे आता स्पष्ट झाले आहे. मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या कलांमध्ये सेतज पाटील यांच्या पॅनेलचे 15 उमेदवार आघाडीवर होते. नंतर हा फरक कमी होत गेला. एका जागेसाठी पुन्हा मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर सतेज पाटलांच्या पॅनेलचे सचिन घोरपडे पराभूत झाले. तर महायुतीच्या पॅनेलचे अमर पाटील यांचा विजय झाला. त्यामुळे सतेज पाटील यांच्या एक पॅनेलची एक जागा कमी झाली. तरीदेखील गोकुळ चालवण्यासाठी जो जादुई आकडा हवा आहे, तो सतेज पाटील यांच्या पॅनेलने गाठला आहे.
गोकुळ निवडणुकीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी (Gokul Dudh Election Winner candidate Full List)
सर्वसाधारण गट
१. अभिजित प्रभाकर तायशेटे (सतेज पाटील)
२. शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर (सतेज पाटील)
३. राहुल पांडुरंग पाटील (महायुती)
४ चेतन अरुण नरके (महायुती)
५ अजित शशिकांत नरके (महायुती)
६ किसन बापूसो चौगले (सतेज पाटील)
७ अंबरीषसिंह संजय घाटगे (महायुती)
८ बाबासाहेब श्रीपती चौगले (सतेज पाटील)
९ राहुल बजरंग देसाई (सतेज पाटील)
१० विद्याधर बाबुराव गुरबे (सतेज पाटील)
११ विरेंद्र संजय मंडलिक (महायुती)
१२ मदन बाबुराव देसाई (महायुती)
१३ बाबासाहेब विष्णू देवकर (सतेज पाटील)
१४ राजेश नरसिंगराव पाटील (महायुती)
१५ रणजितसिंह दिलीपराव पाटील (महायुती)
१६ रणजितसिंह कृष्णराव पाटील (महायुती)
१७ अजित पांडुरंग पाटील (महायुती)
१८ कर्णसिह गायकवाड (महायुती )
१९ विश्वजीत दिनकरराव जाधव (सतेज पाटील)
२० अमर पाटील कोडोली (महायुती)
महिला राखीव गट
१. अंजना केदारी रेडेकर (सतेज पाटील)
२. भाग्यश्री धीरज डोंगळे (सतेज पाटील)
इतर मागासवर्गीय गट
१. शशिकांत शामराव खोत (सतेज पाटील)
अनुसूचित जाती गट
१. राजू बाबा आवळे (सतेज पाटील)
भटक्या-विमुक्त जमाती गट
१. बयाजी शेळके (सतेज पाटील) २. ..
…..
समविचारी आघाडी (सतेज पाटील) – 13 महायुती – 12