Devendra Fadnavis: मेरा पाणी उतरता देख, फडणवीसांची ‘ताजपोशी’ निश्चित? मोहीत कंबाोजचं सुचक ट्विट

| Updated on: Jun 28, 2022 | 1:05 PM

मोहीत कंबोज हे भाजपाचे नेते तर आहेतच पण गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अॅक्टीव्ह झाले आहेत. शिवाय शिवसेनेच्या आमदारांनी बंडाची भूमिका घेतल्यापासून ते या आमदारांच्या बरोबर आहेत. सुरतमधील हॉटेलमध्ये तर ते बरोबर असल्याचे स्पष्ट झाले होते.

Devendra Fadnavis: मेरा पाणी उतरता देख, फडणवीसांची ताजपोशी निश्चित? मोहीत कंबाोजचं सुचक ट्विट
मोहीत कंबाोज
Follow us on

मुंबई : (Shivsena) शिवसेनेतील आमदारांच्या बंडापासून विरोधी पक्षनेते हे गेल्या दोन दिवसांपर्यंत समोर आले नव्हते. शिवाय याबाबत त्यांनी एकदाही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मात्र, भाजपा आणि (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस हे अॅक्शनमोडमध्ये येत आहेत. राजकीय उलथापालथी होत असतानाच पहिल्यापासून बंडखोर आमदारांसोबत असलेले (Mohit Kamboj) मोहीत कंबोज यांचे ट्विट बरेच काही सांगून जाणारे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आपणच मुख्यमंत्री पदी पुन्हा येणार याबाबत जी वाक्य उदगारली होती तेच ट्विट आता मोहीत कंबोज यांनी केले आहे.  त्यामुळे सत्ता स्थापन करण्याबाबत भाजपाच्या गोट्यातही जोरदार हालचाली सुरु असल्याचेच संकेत कंबोज यांनी दिले आहेत.

कंबोज यांचे ट्विट अन् फडणवीस यांचे ते मनोगत

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. मात्र, आपण पुन्हा या पदावर विराजमान होणार याचा त्यांना आत्मविश्वास होता. म्हणूनच त्यांनी विधानसभेत म्हटले होते की, मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊॅंगा, आता हे वाक्य सध्याच्या राजकीय घडामोडीनंतर पुन्हा चर्चेत आले आहे. पुन्हा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असे सुचक विधाने आता भाजपा नेत्यांकडून केली जात आहेत. सध्या सत्तेचे समीकरण स्पष्ट नसले तरी पडद्यामागे अनेक अशा हालचाली सुरु आहेत. आणि त्यातूनच अशा शक्यता समाजमाध्यमातून सर्वांसमोर येत आहेत.

हे सुद्धा वाचा

मोहीत कंबाोज यांच्या ट्विटला वेगळे महत्व

मोहीत कंबोज हे भाजपाचे नेते तर आहेतच पण गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अॅक्टीव्ह झाले आहेत. शिवाय शिवसेनेच्या आमदारांनी बंडाची भूमिका घेतल्यापासून ते या आमदारांच्या बरोबर आहेत. सुरतमधील हॉटेलमध्ये तर ते बरोबर असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे शिवसेनेतील बंडखोर आमदारांबरोबर त्यांचा सहवास राहिला असून आता त्यांनीच ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फोटो ठेऊन, मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं, लौटकर जरुर वापस आऊॅंगा, या वाक्याचा उल्लेख केला आहे. यामध्ये जरुर या शब्दावर त्यांनी विशेष भर दिला असल्याने आता सर्वकाही ठरले आहे की काय असे चित्र निर्माण झाले आहे.

लौटकर ‘जरुर’ आऊॅंगा यामध्येच सर्व आले

विधानसभेत मनोगत व्यक्त करीत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊॅंगा, एवढेच वाक्य म्हटले होते. मात्र, कंबोज यांनी ट्विट करुन लौटकर ‘जरुर’ वापस आऊॅंगा यामध्ये जरुर वर भर देत आत्मविश्वास असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आतापर्यंत यासर्व राजकीय घडामोडीपासून दूर राहिलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस हेच सत्तेच्या केंद्रस्थानी राहणार का असे चित्र निर्माण होऊ लागले आहे.