Uddhav Thackeray: सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला? शिवसेना म्हणते, भूलथापांना बळी पडू नका

"उद्धव साहेब ठाकरे (Uddhav Thackrey) जे बोलायचे ते खुलेआम बोलतात कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये"

Uddhav Thackeray: सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला? शिवसेना म्हणते, भूलथापांना बळी पडू नका
सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला?
Image Credit source: Social Media
रचना भोंडवे

|

Jun 28, 2022 | 12:08 PM

मुंबई: राजकीय भूकंपात अजून एक मोठा हादरा एका बातमीने दिलाय, ती बातमी म्हणजे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि उद्धव ठाकरे यांच्या 21 जून रोजी चर्चा झाली होती अशी बातमी. खरं तर ही साधारण बातमी नसून राजकीय भूकंपच आहे ज्याचे हादरे बसायला आता सुरुवात झालीये. एबीपी न्यूज नेटवर्कने या संदर्भातलं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. टीव्ही 9 मराठी या बातमीला दुजोरा देत नाही. बातमी हाती येताच एकच गोंधळ उडाला आणि यावर स्पष्टीकरण येऊ लागलं. अशा बातम्या प्रकाशित होत आहेत ह्या निव्वळ भूलथापा आहेत असं स्पष्टीकरण शिवसेना जनसंप्रर्कप्रमुख हर्षल प्रधान (Shivsena HArshal Pradhan) यांनी दिलंय. “उद्धव साहेब ठाकरे (Uddhav Thackrey) जे बोलायचे ते खुलेआम बोलतात कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये” असं वक्तव्य हर्षल प्रधान यांनी केलंय.

बातमी साफ खोटी- शिवसेना जनसंप्रर्कप्रमुख

19 जूनला विधान परिषदेची निवडणूक पार पडली. त्याचदिवशी निकाल समोर आला. पण या सगळ्या रणधुमाळीत शिवसेनेत मात्र वेगळ्याच गोष्टी घडत होत्या काही समर्थक आमदारांसह एकनाथ शिंदे सूरतच्या दिशेने रवाना झाले होते. 20 जूनला सकाळी एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याचं वृत्त आलं अन् महाराष्ट्राच्या राजकारकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अश्यात हे सगळं उद्धव ठाकरे यांनीच घडवून आणलंय. त्यांनीच शिंदेंना हे बंड करण्यास सांगितलं असल्याचं बोललं गेलं. अन् त्याला दुजोरा देणारी बातमी आता आली आहे. याच्या दुसऱ्या दिवशी 21 जूनला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून बातचित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु शिवसेना जनसंप्रर्कप्रमुख हर्षल प्रधान यांनी ही बातमी साफ खोटं असल्याचं सांगितलंय.

शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात संजय राऊतांमुळे दरी?

अशा बातम्या हाती येत असतानाच संजय राऊत यांच्या वक्तव्याने वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. संजय राऊतांमुळेच शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातली दरी वाढतीये का असं म्हटलं जातंय. गेल्या दोन दिवसांपासून बंडखोर आमदार दीपक केसरकर हे शिंदे गट आणि शिवसेना यांच्या मध्यस्ती करण्याच्या भूमिकेची वक्तव्य करीत आहेत. मात्र, खा. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे अधिक दरी पडत आहे. असे प्रवक्ते पक्षाला लाभले तर पक्षाचे नुकसानच होणार असे दीपक केसरकर यांनी पत्राद्वारे सुनावले होते. यानंतर आता संजय राऊतांनी त्यांना त्यांच्याच स्टाईमध्ये उत्तर दिले आहे. दीपक केसरकर हे आता नव्याने पक्षात दाखल झाले आहेत. त्यांना काय माहिती शिवसेना पक्ष! एवढेच नाहीतर त्यांनी यावेळी सावंतवाडी मतदार संघातून निवडून येऊन दाखवावे असेही राऊत यांनी ठणकावले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील दरी आणखी वाढणार का अशी स्थिती निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें