AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2026: मुंबईत निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा शिंदे सेनेला मोठा झटका! हा शिलेदार फोडत पत्नीला उमेदवारी, महायुतीची डोकेदुखी वाढणार?

Congress Vs Shinde Sena: मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने पहिला डाव टाकला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला झटका दिला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एक चांगला शिलेदार फोडला आहे. या निष्ठावंताच्या जय महाराष्ट्राने महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

BMC Election 2026: मुंबईत निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा शिंदे सेनेला मोठा झटका! हा शिलेदार फोडत पत्नीला उमेदवारी, महायुतीची डोकेदुखी वाढणार?
काँग्रेस, शिंदे सेना
| Edited By: | Updated on: Dec 30, 2025 | 8:41 AM
Share

Mumbai Municipal Corporation Election: मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने पहिला डाव टाकला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निष्ठावंत शिलेदाराने पक्षाला उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जय महाराष्ट्र केला. तिकीट वाटपातील नाराजीने या निष्ठावंताने शिंदे सेनेला रामराम केला. काँग्रेसने या शिलेदाराच्या पत्नीला तिकीट दिले आहे. एक एक जागा महत्त्वाची असताना महायुतीला काँग्रेसने पहिला चेकमेट दिला आहे. या प्रभागात आता समीकरणं बदलतील का, महायुतीची डोकेदुखी वाढणार का? असा सवाल विचारल्या जात आहे. येत्या 15 जानेवारीनंतर त्याचे उत्तर मिळणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का

शिवसेना विभाग क्रमांक २ चे विभागप्रमुख लाल सिंह राजपुरोहित यांनी शिवसेनेतून राजीनामा दिला आहे. शिवसेना विभागप्रमुख लालसिंग राजपुरोहित यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केलाआहे. लालसिंग राजपुरोहित यांनी त्यांची पत्नी भाग्यलक्ष्मी यांना वॉर्ड क्रमांक ३१ मधून काँग्रेसची उमेदवारी दिली.लालसिंग राजपुरोहित हे शिवसेनेचे विभागप्रमुख होते पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे या प्रभागात आता समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. तर आज अजून काही धक्के बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नगरसेवकांना फॉर्म वाटप

मुंबईत पालिका निवडणुकीसाठी रात्री उशिरा इच्छुक माजी नगरसेवकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फॉर्म वाटले. यात पहिला एबी फॉर्म हा वडाळ्याचे माजी नगरसेवक अमेय घोले यांना देण्यात आला.पालिका निवडणुकीत शिवसेना ९० जागांवर लढत असून शेवटच्या जागेपर्यंत भाजपसोबत वाटाघाटीत रस्सीखेच सुरू होती. बंडखोरी टाळणयासाठी शिंदेंकडून पूर्णतहा खबरदारी घेत रात्री उशिरा शिंदेंनी कुठलिही यादी न काढता,थेट इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटण्यास सुरूवात केली.

मिरा-भाईंदरमध्ये महायुती तुटली

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत महायुती तुटली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये खलबत सुरू होती. पण जागा वाटपात एकमत होत नव्हते. तुटेपर्यंत ताणल्या गेल्याने अखेर या दोन्ही पक्षात दिलजमाई होऊ शकली नाही. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.त्यापूर्वी शिंदे गट आणि भाजप दोन्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असून स्वबळाचा नारा दिला आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...