AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी घड्याळ घालत नाही…’, Nvidia कंपनीच्या सीईओने सांगितले कारण, तुमचेही डोळे खाडकन् उघडतील..

साल २०२४ मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या १२८ व्या दीक्षांत समारंभात संबोधन करताना जेन्सन हुआंग यांनी ते घड्याळ का घालत नाहीत याचे गुपित सांगितले...काय आहे या मागचा नेमका फंडा...

'मी घड्याळ घालत नाही...', Nvidia कंपनीच्या सीईओने सांगितले कारण, तुमचेही डोळे खाडकन् उघडतील..
Nvidia - CEO - Jensen Huang
| Updated on: Jun 30, 2026 | 7:09 PM
Share

जगातील सर्वात मोठी टेक कंपनीपैकी एक असलेल्या Nvidia या कंपनीचे बाजारमुल्य $4.68LCr आहे. या कंपनीला चालवणारे म्हणजे याचे सीईओ जेन्सन हुआंग ( Jensen Huang ) आहेत.जेन्सन हुआंग नेहमीच त्यांच्या अनोख्या अंदाजासाठी ओळखले जातात. मग त्यांचे ते ब्लॅक लेदर जॅकेट परीधान करणे असो की घड्याळ न घालणे असो. ते घड्याळ का घालत नाहीत ? यामागे त्यांचा विचार नेमका काय आहे हे त्यांनीच एका मुलाखतीत सांगितले आहे.

जेन्सन हुआंग यांनी एका पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाचा किस्सा सांगितला. एकदा ते कुटुंबासह जपानच्या क्योटो शहरातील एक प्रसिद्ध गार्डनला पाहायला गेले होते. त्यावेळी उष्णता जास्त होती. त्यांनी पाहिले की एक बुजुर्ग माळी गुडघ्यावर बसुन एका छोट्या चिमट्याने सुखलेले गवत आणि गवतावर जमलेला थर काढून टोपलीत टाकत होता. हे पाहून आपण आश्चर्यचकीत झालो. कारण बाग खूपच मोठी होती आणि माळीकडील उपकरण एकदमच छोटे होते. त्यामुळे आपल्याला न राहवल्याने आपण त्या व्यक्तीला विचारले की ही बाग एवढी मोठी आहे आणि तुमचा चिमटा खूपच छोटा आहे. मग तुम्ही एकट्याने एवढ्या मोठ्या बागेची देखभाल कशी करणार ? तेव्हा त्या माळ्याने शांतपणे उत्तर दिले की माझ्याकडे भरपूर वेळ आहे.

घड्याळ न घालण्याचे खरे कारण ?

माळ्याच्या या छोट्या वाक्याने हुआंगचा यांचा विचार बदलला. त्यांना जाणवले की जर तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करत असाल आणि त्यात संपूर्णपणे व्यग्र होत असाल तर वेळ आणि साधनांची कमतरता तुम्हाला कधी जाणवणार नाही.

या घटनेने प्रेरित होत आपण जीवनातून घड्याळाला कायमचे हटवले. हुआंग यांनी सांगितले की मी घड्याळ घालत नाही कारण माझ्यासाठी वर्तमानच सर्वात महत्वाचा वेळ आहे. स्वत:ला वर्तमानाला समर्पित करणे हाच माझा मंत्र आहे.

जेव्हा तुम्ही वारंवार घड्याळ पाहात असता. तेव्हा वेळेची कमतरता आणि डेडलाईनच्या दबावात येता. हा दबाव तुम्हाला मोकळेपणाने विचार करणे आणि चांगले काम करण्यापासून रोखतो. हुआंग यांच्या मते डेडलाईनला एक ओझे म्हणून न पाहाता, जर तुम्ही वर्तमानात सुरु असलेल्या कामावर संपूर्ण फोकस कराल तर काम आपोआप वेळेवर आणि चांगल्याप्रकारे पूर्ण होईल.

कामावर फोकस करणे गरजेचे

आजच्या काळात जेथे कंपन्या आणि लोक सतत भविष्याची चिंता करत असतात. तेथे हुआंग यांचा विचार एकदम वेगळा आहे. ते आपल्या यशाला तीन गोष्टी जबाबदार असल्याचे मानतात.

पहिली – भविष्याची चिंता करण्याऐवजी समोर आहे, त्याला योग्य रितीने करा. आजचे चांगले कामच तुमचे चांगले भविष्य निश्चित करते.

दूसरी – हुआंग यांचे म्हणणे आहे की ते संधी किंवा खूप जास्त विकासाच्या मागे धावत नाही. त्यांचे सर्व लक्ष त्यांच्या प्रोडक्टला बेस्ट बनवण्यावर असते. मग संधी स्वत: त्यांच्याकडे चालत येते.

तिसरी – त्यांनी तरुणांना सल्ला दिला आहे की प्रत्येक दिवशी नवीन काही शिका. आपल्या कामाचा आनंद घ्या आणि परिणामाची चिंता न करता स्वत:चे शंभर टक्के प्रयत्न द्या.

Follow Us
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर