मोठी बातमी! उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 21 जूनला फोनवर चर्चा झाली होती, सूत्रांची माहिती

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 21 जूनला फोनवर चर्चा झाली होती -सूत्र

मोठी बातमी! उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 21 जूनला फोनवर चर्चा झाली होती, सूत्रांची माहिती
आयेशा सय्यद

|

Jun 28, 2022 | 12:28 PM

मुंबई : एक अत्यंत मोठी राजकीय घडामोड समोर येतेय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या 21 जून रोजी चर्चा झाली होती. एबीपी न्यूज नेटवर्कने या संदर्भातलं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. टीव्ही 9 मराठी या बातमीला दुजोरा देत नाही. मात्र फडणवीस आणि ठाकरे यांच्या फोन वरुन राजकीय घडामोडींबाबत संवाद झाला असल्याची माहिती आता दिली जातेय. वर्षा बंगला सोडल्यानंतर सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांशी फोनवरुन चर्चा केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजप-शिवसेनेचं पुन्हा ‘जुळून येती रेशीमगाठी’?

आपण सगळेच जाणतो की भाजप आणि शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. दोघांची विचारधारा एकच आहे. हिंदुत्वाचा धागा या दोघांना जोडतो. अन् आता पुन्हा एकदा हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. एबीपी न्यूज नेटवर्कने या संदर्भातलं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. टीव्ही 9 मराठी या बातमीला दुजोरा देत नाही. मात्र फडणवीस आणि ठाकरे यांच्या फोन वरुन राजकीय घडामोडींबाबत संवाद झाला असल्याची माहिती आता दिली जातेय. वर्षा बंगला सोडल्यानंतर सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांशी फोनवरुन चर्चा केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिंदे नॉट रिचेबल, ठाकरे- फडणवीसांमध्ये चर्चा

19 जूनला विधान परिषदेची निवडणूक पार पडली. त्याचदिवशी निकाल समोर आला. पण या सगळ्या रणधुमाळीत शिवसेनेत मात्र वेगळ्याच गोष्टी घडत होत्या काही समर्थक आमदारांसह एकनाथ शिंदे सूरतच्या दिशेने रवाना झाले होते. 20 जूनला सकाळी एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याचं वृत्त आलं अन् महाराष्ट्राच्या राजकारकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अश्यात हे सगळं उद्धव ठाकरे यांनीच घडवून आणलंय. त्यांनीच शिंदेंना हे बंड करण्यास सांगितलं असल्याचं बोललं गेलं. अन् त्याला दुजोरा देणारी बातमी आता आली आहे. याच्या दुसऱ्या दिवशी 21 जूनला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून बातचित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

सेना-भाजप युतीचा इतिहास

शिवसेना आणि भाजप जरी सध्या वेगळे झाले असले तर 25 वर्षे या दोन्ही पक्षांची युती होती. पण जेव्हा 2019 विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला अन् अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून त्यांचा काडीमोड झाला. 25 वर्षे शिवसेना युतीत सडली असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं. पण असं जरी असलं तरी हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त झाला. त्या चर्चेला आज दुजोरा मिळाला. फडणवीस आणि ठाकरे यांच्या फोन वरुन राजकीय घडामोडींबाबत संवाद झाला असल्याची माहिती आता दिली जातेय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें