AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smriti Mandhana: केवळ 62 धावा नि स्मृती मानधना इतिहास रचणार! शुभमन गिलचा रेकॉर्ड धोक्यात, क्रिकेटप्रेमींच्या खिळल्या नजरा

Smriti Mandhana Higher Score: भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना सरत्या वर्षात रेकॉर्ड रचण्याची शक्यता आहे. त्यासाठी तिला अवघ्या 62 धावा हव्या आहेत. श्रीलंकेविरोधात टीम इंडिया टी20 अखेरचा सामना खेळत आहे. या सामन्यात स्मृतीने जर धावांचा डोंगर रचला तरी शुभमन गिलचा तो रेकॉर्ड धोक्यात येणार आहे.

Smriti Mandhana: केवळ 62 धावा नि स्मृती मानधना इतिहास रचणार! शुभमन गिलचा रेकॉर्ड धोक्यात, क्रिकेटप्रेमींच्या खिळल्या नजरा
स्मृती मानधना, शुभमन गिलImage Credit source: गुगल
| Updated on: Dec 30, 2025 | 9:22 AM
Share

Smriti Mandhana Higher Score: भारतीय महिला क्रिकेट टीमची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मानधना सरत्या वर्षात कमाल करण्याची शक्यता आहे. या सरत्या वर्षात ती मोठा रेकॉर्ड नावावर नोंदवण्याची शक्यता आहे. यंदा तिने जोरदार कामगिरी बजावली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक नावावर कोरला आहे. त्यात स्मृतीने चमकदार कामगिरी बजावली आहे. श्रीलंकेविरोधात सध्या सुरु असलेल्या टी20 मालिकेच्या चौथ्या सामन्यात तिने 80 धावांची जोरदार खेळी खेळली. यासह तिने जागतिक क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. आता तिच्यासमोर हे वर्ष संपण्यापूर्वी शुभमन गिलचा तो रेकॉर्ड इतिहासजमा करण्याचे आवाहन आहे.

2025 मध्ये एक खास रेकॉर्ड करणार

स्मृती मानधना हिने वर्ष 2025 मध्ये आतापर्यंत तीनही फॉर्म्याटमध्ये एकूण 1703 जागतिक धावांची नोंद केली आहे. हा आकडा महिला क्रिकेटच्या कोणत्या खेळाडूला गाठता आलेला नाही. इतकेच नाही तर पुरुष आणि महिला दोन्ही वर्गात सर्वाधिक धावा करणारी ती जागतिक खेळाडू ठरणार आहे. त्यासाठी तिला अवघ्या 62 धावांची गरज आहे. सध्या भारतीय पुरुष संघाचा कर्णधार शुभमन गिल 2025 मध्ये 1764 धावा करून अव्वल स्थानी आहे.

श्रीलंकेविरोधात अखेरच्या सामन्यात मोठी संधी

भारत आणि श्रीलंकेदरम्यान पाचवा आणि अखेरच्या टी20 सामना आज, मंगळवारी खेळणार आहे. भारतीय महिला संघाने या मालिकेत 4-0 अशी आगेकूच कायम ठेवली आहे. ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये हा सामना खेळला जाणार आहे. जर या सामन्यात स्मृती मानधना हिने 62 धावा केल्या तर ती या वर्षात जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरेल. महिला क्रिकेट जगतासाठी सुद्धा ही मोठी उपलब्धी ठरणार आहे.

स्मृतीचा दबदबा

वर्ष 2025 मध्ये स्मृती मानधना हिचे एकदिवसीय सामन्यातील कामगिरी दमदार राहिली आहे. तिने या वर्षात 23 वनडे सामन्यात 110 च्या स्ट्राईक रेटनुसार, 1362 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने सरासरी जवळपास 62 इतकी आहे. स्मृतीने या वर्षात 5 शतकं आणि 5 अर्धशतकी खेळी खेळली. मोठ्या सामन्यात अंगावर जबाबदारी घेणे आणि संघाला मजबूत सुरुवात करुन देण्यात तिचा सिंहाचा वाटा राहिला आहे. टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये स्मृतीने आठवणीत राहिल अशी कामगिरी बजावली आहे. तिने 9 टी20 सामन्यात 341 धावा ठोकल्या आहेत. तिच्या खेळीमुळे भारतीय संघाची सुरुवात मजबूत राहिलेली आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...