Virat Kohli: कितीचा दिला धनादेश? विराट कोहलीची खरंच केली बोळवण? विजय हजारे करंडकातील बक्षीसावरून वाद पेटला,BCCI वर तिखट हल्ला
Virat Kohli The Player of the Match: विजय हजारे करंडकाची सध्या क्रिकेट जगतात एकच चर्चा आहे. कारण या करंडकात अनेक दिग्गजांनी ऐतिहासिक कामगिरी केली. वैभव सूर्यवंशीच्या तुफान फलंदाजीची तर जगात नोंद झाली. पण सध्या या करंडकातील बक्षिसाच्या रक्कमेवरून वाद पेटला आहे. BCCI वर अनेकांनी तोंडसुख घेतले आहे, काय आहे तो वाद?

Vijay Hazare Trophy BCCI: विराट कोहली हा विजय हजारे करंडक 2025-26 मध्ये दिल्लीसाठी खेळला. IPL मध्ये कोहलीला लिलावात 21 कोटींमध्ये खरेदी करण्यात आले. BCCI या खेळाडूंसोबत कोट्यवधींचे करार करते. तर विविध कंपन्यांच्या जाहिरातीसह इतर गोष्टींतून हे खेळाडू लाखो, कोट्यवधींची कमाई करतात. पण विजय हजारे करंडक हा अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जातो. त्यात खेळाडू आवर्जून हजेरी लावतात. एकदिवशीय सामन्यासाठी खेळाडूंना 6 लाख रुपये मिळतात. तर काही खेळाडू हे 60 हजार रुपये प्रति सामना खेळातात. शुक्रवारी 26 डिसेंबर रोजी दिल्ली विरुद्ध गुजरातच्या सामन्यात विजयानंतर विराट कोहली याला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला.वैभव सूर्यवंशीच्या तुफान फलंदाजीची तर जगात नोंद झाली. पण सध्या या करंडकातील बक्षिसाच्या रक्कमेवरून वाद पेटला आहे. BCCI वर अनेकांनी तोंडसुख घेतले आहे, काय आहे तो वाद?
अवघ्या 10 हजारांचे बक्षीस
गुजरातविरोधात विराट कोहलीने 77 धावांची खेळी खेळली. तो प्लेअर ऑफ द मॅच ठरला. सामनावीर ठरल्याने त्याला घसघशीत बक्षीस देण्यात येईल असे सर्वांना वाटत होते. या बक्षीस सोहळ्यात विराट कोहलीला अधिकाऱ्यांनी सामनावीर म्हणून एक धनादेश दिला. त्यावर हा धनादेश अवघ्या 10 हजार रुपयांचा असल्याचे समोर आले. यापूर्वी वैभव सूर्यवंशी याला सुद्धा इतकाच धनादेश देण्यात आला. इतर खेळाडूंना सुद्धा हीच रक्कम देण्यात आली. रोहित शर्मा जेव्हा मुंबईसाठी खेळला आणि त्याने 155 धावा केल्या. तेव्हा सुद्धा दहा हजार रुपयांचा धनादेश त्याच्या हाती सोपविण्यात आला. सामनावीराला हीच रक्कम देण्यात येते तर एका सामन्यासाठी 60 हजार रुपये देण्यात येते. पण या रक्कमेवरून वाद पेटला आहे. बीसीसीआय इतकी श्रीमंत असताना केवळ दहा हजारांवर खेळाडूंची बोळवण करत असल्याने क्रिकेट प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर याविषयीची नाराजी उमटली आहे. अनेकांनी ही रक्कम वाढवण्याची मागणी केली आहे.
रोहित शर्मा, विराट कोहली या दिग्गजांसाठी दहा हजारांची रक्कम अत्यंत कमी आहे. पण हे खेळाडू या रक्कमेसाठी खेळत नाही तर अत्यंत जुन्या आणि प्रतिष्ठेच्या विजय हजारे करंडकासाठी खेळतात. स्थानिक क्रिकेटमध्ये खेळल्याने स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. तसेच देशी क्रिकेटला चालना मिळते. या खेळाडूंना जवळून खेळताना पाहून इतर खेळाडूंनाही भरते येते. त्यांचे मनोबल वाढते हा सर्वात मोठा फायदा होता.
या करंडकासाठी बीसीसीआयचा मोठा खर्च होतो. आकडेवारीनुसार, जवळपास 18 कोटींचा खर्च येतो. कारण एका सामन्यासाठी खेळाडूला 60 हजार रुपये देण्यात येतात. या करंडकात 135 सामने होतात. प्रत्येक सामन्यात 22 खेळाडू खेळतात. प्रत्येक खेळाडूला 60 हजार रुपये म्हटल्यास ही रक्कम 18 कोटींच्या घरात पोहचते. त्यामुळे सामनावीराला दहा हजार रुपये देण्यात येत असल्याचे समोर येत आहे.
