भाजपात जाताच प्राजक्त तनपुरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, मंचावरूनच केला मोठा वादा, म्हणाले यापुढे…

मला भाजपाने संधी दिली यासाठी मी आभारी आहे. यापुढे पक्ष मला जी काही जबाबदारी देईल, ती जबादारी पार पाडण्याचे काम मी करतो, असे प्राजक्त तनपुरे म्हणाले.

भाजपात जाताच प्राजक्त तनपुरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, मंचावरूनच केला मोठा वादा, म्हणाले यापुढे...
prajakt tanpure
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 30, 2026 | 3:45 PM

Prajakt Tanpure : राज्यात एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीची धूम चालू आहे. आपल्याला तिकीट मिळावे यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आपापल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. काही नेत्यांनी आपली भविष्यातील राजकीय सोय लक्षात घेऊन पक्षातर करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीमध्ये सध्या जागावाटपावर खल चालू आहे. दुसरीकडे अहिल्यानगरातील नेते प्राजक्त तनपुरे हे राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी होते. ते लवकरच शरद पवार यांच्या पक्षाला रामराम ठोकून भाजपात प्रवेश करणार आहेत, असे सांगितले जात होते. अखेर त्यांचा आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश झाला आहे. विशेष म्हणजे या पक्षप्रवेशानंतर ते लगेच पक्षातील कामासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी रवींद्र चव्हाण यांना मोठे आश्वासन हदिले आहे.

प्राजक्त तनपुरे नेमकं काय म्हणाले?

रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज प्राजक्त तनपुरे यांचा भाजपात जाहीर प्रवेश झाला. यावेळी अहिल्यानगरातील अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनही भाजपात प्रवेश केला. प्रवेशानंतर प्राजक्त तनपुरे यांनी यापुढे पक्षवाढीसाठी काम करणार, असे सांगितले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विख पाटील, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे साहेब, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचे मी आभार मानतो. तीन तालुक्यांचा माझा मतदारसंघ आहे. माझ्या मतदारसंघाच्या प्रश्नांची सोडवणूक होईल. माझा मतदारसंघ ग्रामीण आहे. विजेचे, शेतीचे, पाण्याचे प्रश्न आहेत. या प्रश्नांना सोडवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता चालना मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे, असे तनपुरे म्हणाले.

प्राजक्त तनपुरे यांना विधानपरिषदेचे तिकीट?

तसेच, मला भाजपाने संधी दिली यासाठी मी आभारी आहे. यापुढे पक्ष मला जी काही जबाबदारी देईल, ती जबादारी पार पाडण्याचे काम करेन, असे आश्वासन देत पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे आश्वासन तनपुरे यांनी दिले. दरम्यान, तनपुरे यांना भाजपाकडून विधानपरिषदेत संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुढे नेमके काय काय होणार, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ :

Follow Us