भाजपसोबत जाण्यापासून आम्हाला कोण रोखणार?, कुणाची हिंमत आहे?; प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

| Updated on: Oct 15, 2022 | 5:52 PM

येणाऱ्या दहा वर्षात देशात नवीन राजकारणाची सुरुवात होईल. गेल्या साठ वर्षात देशात धर्माचा राजकारण दिसलं नाही. पण आता मात्र तो चेहरा दिसत आहे. देशात नवीन चेहरे, नवीन संघटना आणि नवीन विचारधारा यायला सुरुवात झाली आहे.

भाजपसोबत जाण्यापासून आम्हाला कोण रोखणार?, कुणाची हिंमत आहे?; प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
काँग्रेस-राष्ट्रवादीतही आघाडी होईल की नाही यात शंका?, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान; आंबेडकर असं का म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे: शिवसेना (shivsena) आणि वंचितच्या युतीवर बोलतानाच काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीच्या (ncp) आघाडीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही युती करायला तयार आहोत, असं आम्ही शिवसेना आणि काँग्रेसला कळवलं आहे. पण दीड महिना झाला तरी काँग्रेस आणि शिवसेनेकडून आम्हाला कोणताही निरोप आलेला नाही. आजची परिस्थिती अशी आहे की प्रत्येकाला स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी वेगवेगळं लढावं लागेल, असं सांगतानाच भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही आघाडी होईल की नाही यात शंका आहे, असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. तसेच भाजपसोबत जाण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नसल्याचंही ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकर मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं. शिवसेनेने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे. पण शिवसेनेने कुणाकडेच पाठिंबा मागितला नाही. उलट सगळ्यांनी येऊन त्यांना पाठिंबा दिला. सध्या होणारा बदल राजकीय पक्षांमध्ये दिसू लागला आहे, असं निरीक्षण प्रकाश आंबेडकर यांनी नोंदवलं.

हे सुद्धा वाचा

यावेळी त्यांनी भाजपसोबत युती करण्याबाबतची आपली रोखठोक मते मांडली. भाजप आणि संघावर सर्वाधिक टीका मीच केली आहे. तरी सुद्धा काही पक्षांकडून माझी प्रतिमा मलिन केली जात आहे. माझा आणि माझ्या पक्षाचा बाप कुणीच नाही. आम्हीच आमचे बाप आहोत. कुणाबरोबर जायचं आणि कुणाबरोबर जायचं नाही ते आम्ही मालक असल्यामुळे आम्हीच ठरवणार. भाजपबरोबर जाण्यापासून आम्हाला कोण थांबणार कुणाची हिंमत आहे? असा सवाल त्यांनी केला.

2024 मध्ये नेमक काय होईल हे आज सांगणं अवघड आहे. पण सध्या भाजप आणि आरएसएसच्या विरोधात वातावरण जायला सुरुवात झाली आहे. असंच वातावरण 2014मध्ये काँग्रेसच्या विरोधात जायला लग्ल होतं, असंही त्यांनी सांगितलं.

एखाद्या व्यक्तीवर टीका होणे सहाजिक पण एखादा संस्थेवरती ज्यावेळी टीका व्हायला सुरुवात होते तर ते गंभीर आहे. शिवसेनेचे चिन्ह गोठवणं आणि त्यासोबतच पक्षाचे नाव गोठवणं हा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का? निवडणूक आयोग मनमानी करत आहे. त्यांच्यात वाद झाले म्हणून एखादा पक्ष फ्रिज करणं हा निवडणूक आयोगाला अधिकार आहे की नाही हे सगळं सुप्रीम कोर्टाने तपासलं पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

येणाऱ्या दहा वर्षात देशात नवीन राजकारणाची सुरुवात होईल. गेल्या साठ वर्षात देशात धर्माचा राजकारण दिसलं नाही. पण आता मात्र तो चेहरा दिसत आहे. देशात नवीन चेहरे, नवीन संघटना आणि नवीन विचारधारा यायला सुरुवात झाली आहे, असंही ते म्हणाले.