एका मंत्र्याकडे पाच ते सहा जिल्ह्याची जबाबदारी, पालकमंत्र्यांनी नेमकं कुठं लक्ष द्यायचं?, राष्ट्रवादी पक्षाचा खोचक टोला

फडणवीस, शिंदे सरकारमध्ये अनेक आमदारांनी मंत्रिपदाची मागणी केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.

एका मंत्र्याकडे पाच ते सहा जिल्ह्याची जबाबदारी, पालकमंत्र्यांनी नेमकं कुठं लक्ष द्यायचं?, राष्ट्रवादी पक्षाचा खोचक टोला
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 10:20 AM

मुंबई :  भाजप (BJP), शिंदे (Shinde) सरकारबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शिंदे गटात ठाकरे गटातून जेवढे काही आमदार गेले ते सर्व आमदार मंत्रिपदाची मागणी करत आहेत. त्यामुळे शिंदे – भाजप सरकार टिकणं मुश्किल असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील शिंदे फडणवीस सरकारला टोला लगावला आहे. सध्या 145 आमदारांचं संख्याबळ आहे, तोपर्यंत काही धोका नाही. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेमकी परिस्थिती समोर येईल. आमदारांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करणं अवघड असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पालकमंत्री पदावरून टोला

दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पालकमंत्री पदाच्या वाटपावरून देखील शिंदे फडणवीस सरकारला टोला लगावला आहे. जिल्ह्यातील लोकांच्या काय समस्या आहेत. जिल्ह्यात काही विकास काम बाकी आहेत का हे पहाणं तिथल्या पालकमंत्र्यांची जबाबदारी असते. मत्र सध्याच्या सरकारमध्ये एकाच मंत्र्याकडे पाच ते सहा जिल्हांचा कारभार देण्यात आला आहे. अशा परिस्थितीमध्ये ते प्रत्येक जिल्ह्यावर कसं लक्ष देणार असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

हे सुद्धा वाचा

अजित पवारांची टोलेबाजी

दरम्यान दुसरीकडे अजित पवार यांनी देखील शिंदे, फडणवीस सरकारवर टीका करताना जोरदार टोलेबाजी केली आहे. सध्या 145 आमदारांचे संख्याबळ आहे, तोपर्यंत सर्व ठिक आहे. मात्र मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नेमकी परिस्थिती बाहेर येईल. आमदारांना जी अश्वासने देण्यात आली आहेत, ती जर पूर्व नाही झाली तर परिस्थिती गंभीर बनले असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.