8:37 ला शेवटा ‘तो’ फोन अन् 8:46 ला विमान अपघात! अजितदादांचा शेवटचा फोन कोणाला?
विमान अपघातापूर्वी अजित पवार यांनी कार्यकर्ता श्रीजीत पवार यांच्याशी शेवटचा फोन संवाद साधला. सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी झालेल्या या बोलण्यात जिल्हा परिषदेच्या जागावाटपावर, विशेषतः माळी समाज आणि सुपे गटातील उमेदवारीवर चर्चा झाली. दादांनी श्रीजीत पवारांना सर्वांना संधी देण्याचे आश्वासन दिले.
राजकीय वर्तुळातून समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचा विमान अपघात होण्यापूर्वीचा शेवटचा फोन कॉल कार्यकर्ते श्रीजीत पवार यांच्याशी झाला होता. अपघाताच्या काही वेळापूर्वी, म्हणजेच सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी हा संवाद साधण्यात आला. श्रीजीत पवार यांनी अजित पवारांना जिल्हा परिषदेच्या जागावाटपा संदर्भात, विशेषतः सुपे गटातील उमेदवारीबाबत काही तक्रारी केल्या होत्या.
या फोन संवादात, अजित पवार यांनी श्रीजीत पवारांना सांगितले की माळी समाजाला जिल्हा परिषदेमध्ये सुपे गटातून उमेदवारी दिली आहे आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे धोरण असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी दिगंबर दुर्गाडे यांच्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचे उदाहरणही दिले. 28 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजून 19 मिनिटांनी श्रीजीत पवारांनी एका उमेदवाराच्या निवडीबद्दल अजित पवारांना मेसेज केला होता. विमानाला रेंज मिळाल्यावर अजित पवारांनी तो मेसेज वाचून श्रीजीत पवारांना फोन केला होता. टीव्ही9 मराठी, बारामतीसाठी अजिंक्य धायगुडे यांनी हे वृत्त दिले आहे.
8:37 ला शेवटा तो फोन अन् 8:46 ला विमान अपघात! अजितदादांचं शेवटंच बोलणं
देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याचा अधिकार काय? शरद पवार भडकले
मुंबई एअरपोर्टवर अपघात! विमानांचे पंख एकमेकांना धडकले अन्...
128 दिवसांची झुंज संपली! कफ सिरपमुळे 4 वर्षांच्या चिमूकल्याचा मृत्यू

